Monday 8 June 2020

आय.आय. एच.टी. बरगट, बेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुचना


  जालना दि. 8  (जिमाका) – केंद्र शासनाच्या भारतील हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या शैक्षणिक सत्रारकरीता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यास क्रमांक प्रथम सत्राकरीता महाराष्ट्र राज्यातुन बरगढ (ओडिशा) करीता 13 व वेंकटगिरी करीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागरपुर, सोलापुर, मुंबई, औरंगाबाद यांचे मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि. 17 जुलै 2020 पर्यंत मागविण्यात येत आहेत. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे वेबसाईट www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे भा.प्र.से. आयुक्त वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपुर डॉ. माधवी खोडे चवरे, यांचे कडून कळविण्यात आले आहे.
-*-*-*-*-

No comments:

Post a Comment