Wednesday 17 June 2020

खासगी आस्थापनांनी कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन


जालना दि. 17 (जिमाका) -कोरोना प्रार्दुभावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय इतर जिल्हयातील कर्मचारी,मजुर,कारागीर स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे औद्योगीक क्षेत्रातील आस्थापना,खाजगी आस्थापना  खाजगी स्थानीक बेरोजगार युवक युवतींना  नौकरीची संधी प्राप्त होणार असल्यामुळे अशा बेरोजगारासाठी औद्योगीक क्षेत्रातील आस्थापना, खाजगी आस्थापना यांनी  त्यांना  लागणा-या मनुष्यबळासाठी विभागाच्या - वेब पोर्टलवरील सुविधाचा लाभ घ्यावा या साठी आस्थापनांनी www. mahaswayam.gov.in या पोर्टल वर नोंदणी  करुन प्राप्त होणा-या युझर  ID पासवर्ड चा  वापर करुन त्यांच्या कडील रिक्त पदे अधिसुचीत करुन पात्र बेरोजगाराची यादी प्राप्त करुन घेवून पात्र रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दयावी. तसेच ज्या आस्थापनांनी यापुर्वीच नोंदणी केलेली आहे त्यांनी वरील पोर्टलचा लाभ घ्यावा. विभागाच्या पोर्टलवरुन रिक्त पदे अधिसुचीत करणे, शैक्षणिक पात्रतेनुसार कुशल मनुष्यबळाबाबतची माहिती तसेच रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमाअतर्गत रिक्त पदे अधिसुचित करणे आस्थापनातील मनुष्यबळाची माहिती भरणे (ER -1) इ. सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच www.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर रोजगारासाठी इच्छुक सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांची नोंदणी करण्यात येते. त्या मध्ये नोंदणी कृत उमेदवाराचे नांव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, ईमेल मोबाईल नंबर इत्यादीची माहिती आस्थापनांना  प्राप्त होऊ शेकते.
            ज्या सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त करावयाची आहेत अशा उमेदवारांनी EMPLOYMENT या  OPTION वर क्लिक करुन वरील संकेत स्थळावर नोंदणी करावी तसेच ज्या उमेदवारांनी नोदणी आधार लिंक केली नाही त्यांनी नोंदणी आधार लिंक करावी. सदर नोंदणी ही विनामुल्य आहे.
            आस्थापना उमेदवारांना नोंदणी बाबत काही अडचण असल्यास त्यांनी जिल्हा कौशल्य, विकास रोजागर उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना येथील दुरध्वनी क्रमांक 02482 - 225504 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य, विकास रोजागर उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.           
-*-*-*-*-

No comments:

Post a Comment