Wednesday 17 June 2020

जालना शहरामध्ये सामाजिक अंतराचे पालन न केल्यामुळे 89 व्यक्तींवर कारवाई सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या 50 व्यक्तींकडून 28 हजार 900 रुपयांचा दंड वसुल जिल्हा पोलीस प्रशासनाची माहिती

जालना, दि. 16 (जिमाका):-  जालना शहरामध्ये विविध ठिकाणी दुकानांमध्ये व बँकासमोर सामाजिक अंतराचे पालन न केल्यामुळे पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करत 89 व्यक्तींवर कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करत सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या 50 व्यक्तींवर कारवाई करुन 28 हजार 900 रुपयांचा दंड वसुल केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
            जालना शहरातील नवामोंढा भागात सामाजिक अंतराचे पालन करणाऱ्या दोन दुकानांवर तर गरीबशह बाजार व साईनाथ नगर परिसरातील दोन मेन्स पार्लवर ग्राहकांची गर्दी केल्याने तसेच सामाजिक अंतराचे पालन न केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहेमहाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे जालना तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहितीही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
            कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, विनाकारण घराबाहेर पडू नये, जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.
*******

No comments:

Post a Comment