Wednesday 24 June 2020

कल्याणकारी योजनेचा अन्नधान्याचा पुरवठा


जालना, दि. 24 -   माहे एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी कल्याणकारी योजनेच  तालुकानिहाय गहू प्रत्येक तालुक्यातील शासकीय व शासन अनुदानित संस्थासाठी गहू क्वांटम 8 किलो तर तांदूळ क्वांटम 7 किलो प्रतिलाभार्थी वितरणासाठी नियतन प्राप्त झाले असुन त्याचा तपशिल पुढील प्रमाणे.
 जालना तालुक्यासाठी   गहू  00 किलो तर तांदूळ 173.5 क्विंटल,  बदनापूरसाठी  गहू 584.09 क्विंटल, तांदूळ 912 क्विंटल, भोकरदन गहू 233 क्विंटल, तांदूळ 485 क्विंटल,  जाफ्राबाद गहू 11 क्विंटल,  तांदूळ 00 क्विंटल,  परतुर  गहू  123 क्विंटल, तांदूळ 00 क्विंटल,  मंठा  गहू 184 क्विंटल,  तांदूळ 200 क्विंटल, अंबड  गहू व तांदुळ 00 क्विंटल तर   नसांवगी तालुक्यासाठी  गहू व तांदूळ 00 क्विंटल.
कल्याणकारी सदस्य व वसतीगृह योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी कल्याणकारी संस्था व वसस्तीगृह यांना संबधित विभागाची मान्यता प्राप्त असणे आवश्यक आहे. कल्याणकारी संस्था व वस्तीगृहे यांनी अन्नधान्यासाठी कोणतिही फी आकारु नये. वस्तीगृहाच्या बाबतीत वस्तीगृहामध्ये एकूण लाभार्थ्याना 2/3 लाभार्थी हे एस.सी.एस.टी.ओबीसी प्रवर्गातील असावेत. कल्याणकारी संस्था व वस्तीगृहाचे लेखे लेखापरिक्षणासाठी लेखा व कोषागार विभागाच्या जीएफआर नुसार उपलब्ध असणे आवश्यक आहे.
या योजनेतंर्गत केवळ राज्य शासनाच्या शासनाकडून अनुदान प्राप्त होणा-या कल्याणकारी संस्था/ वस्तीगृहे अन्नधान्याच्या मालकीच्या व राज्य शासनामार्फत चालविण्यात येणा-या व राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त होणा-या कल्याणकारी संस्था, वस्तीगृहे,अन्नधान्याचा लाभ मिळविण्यास पात्र आहे.त्यामुळे संस्थांची पात्रता तपासूनच पात्र संस्थानाच अन्नधान्य वाटप करण्यात यावे. केंद्र शासनाच्या व केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त होणा-या तसेच राज्यातील खाजगी संस्था, वस्तीगृहे व अन्न तत्सम स्वरुपांच्या संस्था, वस्तीगृहे या योजनेतंर्गत अन्नधान्याचा लाभ मिळण्यास पात्र राहणार नाहीत. सदर संस्था/ वस्तीगृहांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येऊ नये.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कारागृहे/ हॉस्पीटल्स कल्याणकारी योजनेच्या लाभास पात्र राहणार नाहीत. त्यामुळे क्षेत्रिय कार्यालयाकडून प्राप्त कल्याणकारी संस्था/ वस्तीगृहाच्या तपशीलापैकी कारगृहे/हॉस्पीटल्स यांना वगळून उर्वरित कल्याणकारी संस्था/वस्तीगृहासाठी अन्नधान्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. क्षेत्रीय कार्यालयांनी या योजनेतंर्गत  कारगृहे/ हॉस्पीटल यांना अन्नधान्याचे वाटप करु नये. कल्याणकारी संस्था व वस्तीगृहे योजनेतंर्गत राज्य शासनाच्या मालकीच्या व राज्य शासनामार्फत चालविण्यात येत असलेल्या कल्याणकारी संस्थासह राज्य शासन अनुदानित कल्याणकारी संस्था व वस्तीगृहानांच नियतन वितरित करण्यात यावे. अपात्र संस्थाना नियतन वितरित करण्यात येऊ नये अन्नधान्याच्या वितरण संदर्भात अनियमितता झाल्यास संबधित अधिकारी/ कर्मचारी यांच्याविरुध्द जबाबदारी निश्चित करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी,जालना यांनी प्रसिध्दी पत्राकाव्दारे कळविले आहे.
-*-*-*-*-

No comments:

Post a Comment