Thursday 11 June 2020

विना शिधापत्रिकाधारकांना मे व जुन महिन्याचा अन्न धान्याचा पुरवठा


जालना,दि,11:- (जिमाका) -  केंद्रशासनाच्या आर्थिक उपाययोजने अंतर्गत आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा योजने अंतर्गत कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारक व्यक्तींना माहे मे  व जुन 2020 प्रति लाभार्थीं 5 किलो तांदुळ देण्यात येणार आहे.
जालना तालुक्यात 20 हजार 952 लाभार्थीं संख्या असुन त्यांना प्रत्येक 5 किलो प्रमाणे मे महिन्यात 1 हजार  48 क्विंटल ,जुन महिन्यात 1 हजार  48क्विंटल तांदुळ देण्यात येणार आहे,बदनापुर  तालुक्यात 1 हजार 183 लाभार्थीं संख्या असुन त्यांना प्रत्येक 5 किलो प्रमाणे मे महिन्यात  59  क्विंटल ,जुन महिन्यात 59 क्विंटल  तांदुळ देण्यात येणार आहे,भोकरदन  तालुक्यात 35 हजार 618 लाभार्थीं संख्या असुन त्यांना प्रत्येक 5 किलो प्रमाणे मे महिन्यात  1 हजार 781 क्विंटल ,जुन महिन्यात 1 हजार 781  क्विंटल  तांदुळ देण्यात येणार आहे,जाफ्राबाद   तालुक्यात 5 हजार 154  लाभार्थीं संख्या असुन त्यांना प्रत्येक 5 किलो प्रमाणे मे महिन्यात  258 क्विंटल ,जुन महिन्यात 258  क्विंटल  तांदुळ देण्यात येणार आहे,परतुर तालुक्यात 2 हजार 16  लाभार्थीं संख्या असुन त्यांना प्रत्येक 5 किलो प्रमाणे मे महिन्यात 101 क्विंटल जुन महिन्यात 101 क्विंटल  तांदुळ देण्यात येणार आहे,मंठा तालुक्यात 1 हजार 474 लाभार्थीं संख्या असुन त्यांना प्रत्येक 5 किलो प्रमाणे मे महिन्यात  74 क्विंटल जुन महिन्यात 74 क्विंटल  तांदुळ देण्यात येणार आहे,अंबड तालुक्यात 4 हजार 174 लाभार्थीं संख्या असुन त्यांना प्रत्येक 5 किलो प्रमाणे मे महिन्यात  209 क्विंटल जुन महिन्यात 209  क्विंटल  तांदुळ देण्यात येणार आहे,घनसावंगी तालुक्यात 9 हजार 656 लाभार्थीं संख्या असुन त्यांना प्रत्येक 5 किलो प्रमाणे मे महिन्यात  483 क्विंटल जुन महिन्यात 483 क्विंटल  तांदुळ देण्यात येणार आहे, असे एकुण 8 हजार 227 लाभार्थ्यांना मे महिन्यात 4 हजार 13 क्विंटल व जुन महिन्यात 4 हजार 13 क्विंटल तांदुळ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
-*-*-*-*-





No comments:

Post a Comment