Thursday 4 June 2020

कलम 144 चे सुधारित मनाई आदेश जारी


जालना, दि. 4 :- कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. शासनाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन दिनांक 30 जुन, 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत वाढविला आहे. तसेच लॉकडाऊन मधील निर्बधांची सुलभता आणि लॉकडाऊन टप्पानिहाय उघडणे (Mission Begin Again) बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असुन त्या अनुषंगाने रविंद्र बिनवडे, जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 () () अन्वये जिल्ह्यात सुधारित मनाई आदेश लागू केले आहेत.
लॉकडाऊन टप्पानिहाय उघडणे (Mission Begin Again) अंतर्गत खालीलप्रमाणे सुट
            शैक्षणिक संस्था (विद्यापीठ/महाविद्यालये/शाळा) यांची कार्यालये/कर्मचारी केवळ शिक्षकेतर उद्देशाने (only for the purpose of non-teaching activities) जसे ई-सामग्रीचा विकास, उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन आणि निकाल जाहीर करण्यासाठी कामकाज करू शकतील. तसेच जिल्ह्यातील सर्व खते, बियाणे/औषधे/कृषी यंत्रे/अवजारे/ ट्रॅक्टर उपकरणे व त्यांची दुरुस्ती स्पेअर पार्टस/स्प्रेपंप/सिंचन साहित्य/पाईप/ठिबक/तुषार सिंचन/शेततळे अस्तरीकरण कागद इत्यादी संबंधीत दुकाने व दुरूस्ती सकाळी ७ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.  तसेच यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशातील प्रतिबंधित बाबी कायम राहणार आहेत.
कुठल्याही व्यक्तींकडून या आदेशातील सूचनांचे उललंबन झाल्यास त्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व्या कलम ५१ ते ६० नुसार कारवाई केली जाईल. त्यासोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
*******

No comments:

Post a Comment