Wednesday 24 June 2020

प्रत्येक शेतकऱ्याला पीककर्ज उपलब्ध करुन द्या. कंन्टेन्टमेंट झोनमधुन नागरिकांनी बाहेर पडू नये एसबीआय, युनियन बँक तसेच शहरातील कंन्टेन्टमेंट भागास भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या सुचना


जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या सुचना
            जालना दि. 24 – जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज दि. 24 जुन रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या मुख्य शाखेस, अंबड येथील एसबीआय  तसेच रामनगर येथील युनियन बँकेला भेट देऊन शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीककर्जाचा बँकेच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.  तसेच जालना शहरातील कन्टेन्टमेंट झोनला प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली.
            बँक अधिकाऱ्यांकडून आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकांच्या लागवडी तसेच मशागतीसाठी पीककर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते.  शासन तसेच प्रशासनामार्फत प्रत्येक बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  पीककर्जाचे दिलेले उद्दिष्ट प्रत्येक बँकांनी शंभर टक्के पुर्ण करावे.  तसेच जिल्ह्यातील एकही गरजू शेतकरी पीककर्जापासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देत ज्या बँका दिलेले उद्दिष्ट पुर्ण करणार नाहीत अथवा पीककर्ज देण्यास टाळाटाळ करतील अशा बँकांवर कारवाई करण्याचा ईशाराही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिला.
            यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, एलडीएम निशांत ईलमकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांनो कंन्टेन्टमेंट भागातुन बाहेर पडू नका
            जालना शहरामधील कंन्टेन्टमेंट भागास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज प्रत्यक्ष भेट देत या भागाची पहाणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असुन कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये.  केवळ अत्यावश्यक असेल त्या वेळीच घराबाहेर पडा.  सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन, मास्क, सॅनिटायरचा वापर, वारंवार साबणाने हात धुणे या बाबींची सवय लावून घेण्याबरोबरच प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अंबड येथील कापूस खरेदी केंद्राला भेट
            अंबड येथे सुरु करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्राला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज प्रत्यक्ष भेट देत खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची पहाणी करुन एकाही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना यावेळी दिले.
            यावेळी आमदार नारायण कुचे, उप विभागीय अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हाउपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांच्यासह अधिकारी व शेतकऱ्यांची  उपस्थिती होती


अंबड तहसिल कार्यालयास जिल्हाधिकाऱ्यांची भेट
            अंबड येथील तहसिल कार्यालयास जिल्हाधिकारीरवींद्र बिनवडे यांनी भेट देऊन तेथील कामकाजाचा महसुल अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
            यावेळी उप विभागीय अधिकारी शशीकांत हदगल, तहसिलदार श्री शिंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
*******           

No comments:

Post a Comment