Saturday 6 June 2020

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अरोरा 8 जुन रोजी सायं. 4-00 वाजता फेसबुक लाईव्हवर साधणार संवाद


जालना (जिमाका) दि. 6 :- कोव्हीड-19 च्या या आव्हानात्मक काळात आपले शासन आणि विविध सेवाभावी संस्था, जिल्हा आरोग्य, पोलीस तसेच प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येकजण एकत्रित येऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. या प्रयत्नांना आपल्या जालना जिल्हा वासियांनी समर्थ साथ दिली आहे. आपली ही प्रयत्नांची पराकाष्ठा सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सावरण्याची आहे.. शेतकरी, कष्टकरी कामगारांना, समाजातील सर्वच घटकांना सावरण्याची आहे. अशा या काळात जनतेच्या मनात काही प्रश्न असू शकतात याची जिल्हा प्रशासनाला कल्पना आहे.लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे यासाठी आपल्याशी फेसबुक लाईव्हद्वारे आपले जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अरोरा हे सोमवार  दि. 8 जुन, 2020 रोजी सांय. 4-00 वाजता संवाद साधणार आहेत. त्यांचा हा संवाद https://www.facebook.com/diojalna uया फेसबुक पेजवर सर्वांना साधता येईल.
संवाद:- सोमवार दिनांक 8 जून 2020
वेळ सायंकाळी 4-00
लाईव्ह पहा https://www.facebook.com/diojalna लिंकवर
*******


No comments:

Post a Comment