Monday 8 June 2020

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पुरवठा विभागाने केलेली कार्यवाही

जालना दि. 8  (जिमाका) –कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाकडुन जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत रास्तभाव दुकानदारामार्फत करण्यात येणा-या धान्य वितरणाच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दोषी आढळुन आलेल्या सहा रास्तभाव दुकानांचे प्राधिकारपत्र निलंबीत करण्यात आले असून दोन दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द व 38 रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्राची अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच 25 स्वस्त धान्य दुकानदारांना खुलासा सादर करण्याची नोटीस देण्यात आली आहे. माहे एप्रिल व मे 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना 14 हजार 306 क्विंटल मोफत तांदुळ वाटप करण्यात आला आहे. तसेच दि. 4 जुन 2020 अखेर चनादाळ व तुरदाळ अशी एकुण 282 मेट्रीक अन वाटप करण्यात आली आहे.  विना शिधापत्रिका धारक यांना वाटप करावयाचे धान्य मे व जुन 2020 या कालावधीत वाटपाकरीता 401.30 मेट्रीक टन तांदुळ वा चना 17.90 मेट्रीक अन प्राप्त झाले असून हे धान्य वाटप करण्याची कार्यवाही सुरु आहे असे जिल्हा पुरवठा अधिाकरी आर.एन. बसैय्ये यांनी कळविले आहे.
-*-*-*-*- 

No comments:

Post a Comment