Wednesday 10 June 2020

शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या कापसाच्या तपासणी व पडताळणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी


जालना, दि. 10 (जिमाका) - जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी तालुकानिहाय किती कापुस विक्रीसाठी शिल्लक आहे. याबाबत कापुस उत्पादक शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष भेट देउुन तपासणी व पडताळणी करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी व गटसचिव यांच्या नेमणुकीसाठी तहसिलदार व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी समन्वय ठेऊन आपल्या स्तरावरुन आवश्यक ती उपाययोजना करुन सविस्तर आदेश निर्गमित करावेत व संबंधित नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना कापुस उत्पादक शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी व पडताळणी करण्याचे निर्देश देण्यासाठी आदेश निर्गमित केले आहेत.
संपुर्ण देशामध्ये कोरोना विषाणुच्या (Covid-19) प्रादुर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ होत असुन जालना जिल्ह्यात सुध्दा कोरोना बाधित रुग्णांची संख्या  दिवसेंदिवस वाढत आहे.  त्यामुळे  शासनाने कोरोना विषाणुचा (Covid-19)  प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी राज्यात रोग प्रतिबंधक कायदा 1897 दि. 14 मार्च 2020 पासुन लागु करुन खंड -2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित करुन संपुर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
            जिल्ह्यात अद्यापही बहुतांश शेतक-यांकडे  लॉकडाऊनमुळे कापूस विक्रीसाठी शिल्लक आहे. दि. 17 एप्रिल 2020 ते दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत 40 हजार 577 शेतक-यांनी 1 लाख 1 हजार 537 क्विंटलची कृषि उत्पन्न  बाजार समित्यांकडे नोंदणी केलेली आहे. या कार्यालयाचे संदर्भीय आदेशान्व्ये जिल्ह्यातील शेतक-यांकडे शिल्लक असलेल्या कापसाची तपासणी करण्यात आलेली होती.   या तपासणीवरुन शिल्लक कापुस असलेल्या शेतक-यांची संख्या ही 18 हजार 606 आहे.  
        संबंधित नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तहसिलदार व संबंधित सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या निर्देशनुसार तात्काळ प्रभावाने कामकाज हाताळावे  आणि केलेल्या कामाचा दैनंदिन अहवाल तहसिलदार व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा उपबिनंधक सहकारी संस्था, जालना यांच्या कार्यालयास सादर करावा, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
कापुस तपासणीबाबत करावयाची कार्यवाही
 कृषि उत्पन्न बाजार समितीने करावयाची कार्यवाही :- नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमधुन दि. 10 जुन 2020 पर्यंत सी.सी.आय यांच्याकडे कापुस विक्री करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची नावे वगळुन उर्वरित शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या (संपुर्ण पत्ता व मोबाईल क्रमांकासह) तयार करुन तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांना दि. 11 जुन  पर्यंत सकाळी 11-00 वाजेपर्यंत तहलिसदार व संबंधित सहाय्यक निबंधक यांना उपलब्ध करुन द्याव्यात.
 तहसिलदार व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी करावयाची कार्यवाही :- दि. 11 जुन 2020 पासुन प्रत्यक्ष शेतकरीनिहाय तपासणी करावयाची आहे. त्यासाठी तालुक्यातील संबंधित कर्मचाऱ्यांना तपासणी करण्यासाठी द्यावयाच्या गावाबाबत तहसिलदार यांच्या स्तरावरुन आदेश निर्गमित करावेत.  तहसिल कार्यालयात बाजार समितीकडून प्राप्त झालेली यादी संबंधित कर्मचाऱ्यांना उपलब्ध करुन द्यावी. आवश्यकतेनुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज भासल्यास गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधुन कर्मचारी उपलब्ध करुन घ्यावेत.
        विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे गटसचिव व कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्याकडील कंत्राटी, कायम कर्मचारी यांना स्वतंत्र आदेश देऊन या कामकाजासाठी उपलब्ध करुन घ्यावे. आदेश काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना या कार्यालयास पाठविण्यात यावी. हे कामकाज दि.15 जुन पर्यंत पुर्ण करावयाचे असल्याने त्याप्रमाणे कर्मचारी यांचे नियेाजन करण्यात यावे. 
         दि. 11 जुन  2020 रोजी तहसिल कार्यालयात संबंधित तपासणीपथकातील अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घ्यावी. तपासणी कामकाजाबाबत सुचना देऊन दैनंदित अहवाल तहसिलदार व सहाय्यक निबंधक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना यांच्या कार्यालयास सादर करण्यात  यावा.
तपासणी अधिकारी, कर्मचारी यांनी करावयाची कार्यवाही :- तपासणी अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या गावातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याकडे विक्रीसाठी किती कापुस शिल्लक आहे, याबाबत नोंद घ्यावी. तसेच विहित नमुन्यात तपासणी अहवाल तयार करावा.  तपासणीच्यावेळी शेतकऱ्याकडील प्रत्यक्ष कापुस साठ्याबाबत शेतकऱ्यांचे फोटोग्राफ भ्रमणध्वनीवर घ्यावेत.  विहित नमुन्यातील तपासणी अहवाल शेतकऱ्यांच्या यादीसह दररोज तहसिलदार यांच्याकडे सादर करावा, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
*******

No comments:

Post a Comment