Thursday 18 June 2020

जिल्ह्यातील मेडीकल व हॉस्पीटल वगळता दुकाने सकाळी 9-00 ते 5-00 वाजेपर्यंतच सुरु जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे निर्देश जारी


जालना, दि. 18 (जिमाका):- शासनाने लॉकडाऊन मधील निर्बंधाची सुलभता आणि लॉकडाऊन टप्पेनिहाय उघडणे (mission begin again)बाबत निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सुचनाच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व खते, बियाणे, औषधे,कृषी यंत्रे,अवजारे, ट्रॅक्टर उपकरणे व त्यांचे दुरुस्ती स्पेअर पार्टस, स्प्रे पंप, सिंचन साहित्य, पाईप, ठिंबक,तुषार सिंचन, शेततळे अस्तीकरण कागद इत्यादी संबंधी दुकाने व दुरुस्ती सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यत सुरु राहतील,असे यापूर्वीच्या आदेशामध्ये नमुद करण्यात आले आहे. त्यात अंशत: सुधारणा करुन जालना जिल्हयातील सर्व दुकाने (मेडिकल/हॉस्पिटल) यांचे उघडण्याचे व बंद करण्याच्या वेळेमध्ये एकसुत्रता आणण्यासाठी जिल्हयातील सर्व दुकाने उघडण्याची व बंद करण्याची वेळ अनुक्रमे सकाळी 09 .00 ते सायंकाळी 05.00 पर्यत राहिल, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी निर्गमित केले आहेत.  
           कुठल्याही व्यक्तीकडुन या आदेशातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास कोणत्याही व्यक्ती,संस्था अथवा समूह आपत्ती यांचे विरुध्द व्यवस्थापन अधिनियम , 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड संहित ,1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल व पुढिल कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
*******

No comments:

Post a Comment