Thursday 11 June 2020

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे त्याच बॅक शाखेने कर्ज वितरण करण्याचे आवाहन


          जालना,दि,11:- (जिमाका) ज्या बँक शाखेमार्फत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे. त्याच बँक शाखांनी नवीन कर्ज वितरण करण्याबाबत जिल्हा अग्रणी बॅकेचे व्यावस्थापक यांनी जिल्हयातील सर्व बँक समन्वयकांना आवाहन केले आहे.
       सन 2020- 21 हंगामामध्ये जिल्हयातील सर्व राष्ट्रीयकृत,ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या शाखांना जिल्हास्तरीय बँकर्स समितीकडून खरीप हंगाम 2020 साठी 111531.00 लाख एवढे उदिष्ट दिले असून त्याप्रमाणे पीक कर्ज वितरण बँकेमार्फत करण्यात येत आहे. बँकाच्या सेवा क्षेत्रा ज्या गावापुरते आहे, त्याच गावातील लोकांना बँक कर्ज वितरण करत आहेत. परंतू महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये शेतक-यांना ज्या बँकामार्फत कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे, अशा शेतक-यांच्या बॅंकाचे सेवाक्षेत्र बदलल्यामुळे त्यांना बँका कर्ज वितरण करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
       शेतक-यांना ज्या बँक शाखेतुन कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, त्या बँक शाखेने शेतक-यांना कर्ज वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्य
-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment