Thursday 18 June 2020

सामाजिक अंतर न राखणाऱ्या तसेच तोंडाला मास्क न लावणा-या नागरिकांवर होणार दंडात्मक कारवाई

जालना, दि, 18 (जिमाका) :-  जालना शहरामध्ये सामाजिक अंतर न राखणाऱ्या तसेच तोंडाला मास्क न     लावणा-या व नियमांचे उलंघन करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला असुन यासाठी पथकांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
         सार्वजनिक स्थळी (रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालये इत्यादी ) ठिकाणी थुंकल्यास त्या व्यक्तीला  1 हजार रुपये दंड,  सार्वजनिक स्थळी चेह-यावर मास्क न वापरणे, नाक व तोंड सुरक्षितपणे झाकलेले नसणे 500 रुपये दंड, दुकानावर, फळे, भाजीपाला विक्रते, सर्व जीवनावश्यक वस्तु विक्रेते, ईत्यादी व ग्राहक यांनी सोशल डिस्टसिंग न राखणे ग्राहक व्यक्तींना 200 रुपये दंड, ग्राहकांमध्ये कमीत कमी 3 फुट अंतर न राखणे, विक्रेत्यांने मार्किग न करणे आस्थापना, मालक, दुकानदार व विक्रेता यांना 2 हजार रुपये दंड, किराणा, जीवनावश्यक वस्तु विक्रेत्याने वस्तुंचे दरपत्रक न लावणे  5 हजार रुपये दंड,  सार्वजनिक स्थळी ( रस्ते, बाजार, रुग्णालय इत्यादी ठिकाणी ) एखादी व्यक्ती विनाकारण आढळून आल्यास 1 हजार रुपये दंड, एखादी व्यक्ती दुचाकीवरुन वैयक्तीक वापरासाठीचा भाजीपाला, किराणा, औषधी इत्यादी घेवून जात असल्याची बतावणी करुन अनावश्यक फिरत असल्यास 1 हजार रुपये दंड लावण्यात करण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकारी, नगरपालिका, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*******

No comments:

Post a Comment