Wednesday 17 June 2020

जिल्ह्यात सात व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर सात रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना, दि. 17 (जिमाका) :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन राममंदिर परिसर, जाफ्राबाद येथील -1, जालना शहरातील संभाजीनगर परिसरातील-1, लक्कडकोट परिसरातील-1, मोदीखाना परिसरातील-1 लक्ष्मीनारायणपुरा परिसरातील-3, असे एकुण 7 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे तर दि. 17 जुन 2020 रोजी जालना शहरातील समर्थनगर परिसरातील 1,  राज्य राखीव पोलीस दलातील 1 जवान, जिल्हा सामान्य रुग्णालयातील 1 डॉक्टर, भाग्यनगर  परिसरातील 1, जामवाडी ता. जालना येथील 1, नानक निवास जालना येथील 1, आदर्श नगर जाफ्राबाद येथील 1 अशा एकुण 7 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.
             जामवाडी ता. जालना येथील रहिवासी असलेला 60 वर्षीय पुरुष रुग्ण चार ते पाच दिवसांपासुन आजारी होता. त्याने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र त्याची तब्येत गंभीर झाल्यामुळे त्यास शहरातील एका खाजगी रुग्णालयात दि. 16 जुन 2020 रोजी आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी संबंधित रुग्ण गंभीर असल्यामुळे त्याला सामान्य रुग्णालयात संदर्भित (Refer) केले. संबंधित रुग्णास दि. 16 जुन 2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. ताबडतोब त्यांच्या लाळेचा नमुना घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल दि. 17 जुन 2020 रोजी प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–3492 असुन सध्या रुग्णालयात -97, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1321, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–161, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4202, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने7 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -316, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -3759, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-399, एकुण प्रलंबित नमुने -123, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1215.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती11, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती –1119,आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-14, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-315, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत23,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 97, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-128, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-7, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -192, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 110, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -05, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 8754, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 09एवढी आहे.  

     कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण -315 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये : - पोलीस प्रशिक्षण केंद्र–98, मोतीबाग शासकीय मुलींचे वसतिगृह -25, संत रामदास वसतिगृह जालना-30, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना- 23, मुलींचे शासकीय निवासी वसतिगृह जालना- 35, मुलींचे शासकीय वसतिगृह भोकरदन -2,             डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड – 8, शासकीय मुलींचे वसतिगृह अंबड-36, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापुर- 14, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी – 2, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह घनसावंगी-6, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह इमारत क्र.2 भोकरदन- 13, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद- 12, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-8, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना – 3.

             लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 169 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 821 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 33 हजार 430 असा एकुण 3 लाख 60 हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
*-*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment