Tuesday 2 June 2020

वाळुघाटाच्या लिलावासाठी ऑनलाईन पद्धतीने 4 जुन रोजी जनसुनावणी हरकती, आक्षेप, सुचना अभिप्राय ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याचे आवाहन


जालना, दि. 2 (जिमाका) :- कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे व सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक असल्याने अशा परिस्थितीमध्ये जनसुनावणीसाठी झुम ॲप्‍ किंवा यासारख्या डिजिटल माध्यमांचा तसेच ई-मेलद्वारे हरकती व सुचना मागविण्याचे निर्देश अवर सचिवांनी दिले आहेत.  त्यामुळे सन 1019-20 या वर्षातील निश्चित करण्यात आलेल्या वाळुघाटाचा लिलाव करण्यासाठी जिल्ह्यातील एकुण 23 वाळुघाटासाठीची माहिती ऑनलाईन पद्धतीने जनसुनावणी दि. 4 जुन, 2020 रोजी सकाळी 11-00 वाजता                                               https://mh-dit.webex.com/meet/collector.jalna या लिंकद्वारे घेण्यात येणार आहे.
        या 23 वाळुघाटांची यादी जालना जिल्ह्याचे www.jalna.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असुन जनसुनावणीच्या अनुषंगाने काही हरकती, आक्षेप, अभिप्राय, सुचना असल्यावर वरील लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने कळविण्यात याव्यात, असे अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*******

No comments:

Post a Comment