Thursday 18 June 2020

जिल्ह्यात नऊ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर एकोणतीस रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



जालना, दि. 18 (जिमाका) :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन आदर्शनगर जाफ्राबाद येथील -6 किल्ला परिसर जाफ्राबाद येथील 11,जालना शहरातील बालाजीनगर परिसरातील 7,मंगळबाजार  परिसरातील 1,आंबेडकर  हॉस्टेल -3,बेथल  ता.जालना येथील 1 असे एकुण 29 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे तर दि. 18जुन 2020 रोजी राज्य राखीव पोलीस दलातील  8 जवान, गुडला गल्ली परिसरातील 1 असे एकूण 09 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.

जालना शहरातील दर्गा वेस  परिसरातील 60 वर्षीय पुरुष रुग्णास  न्युमोनिया व मधुमेहाचा ञास होत असल्या कारणाने दि. 13 जुन 2020 रोजी जिल्हा सामान्य  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांच्या लाळेच्या नमुनावर अहवाल दि. 15जुन 2020 रोजी प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त झाला.उपचारादरम्यान त्यांचा दि. 18 जुन 2020 रोजी मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
             
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–3546 असुन सध्या रुग्णालयात -85, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1335, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–52, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4254, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने9 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -325, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -3871, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-399, एकुण प्रलंबित नमुने -55, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1240.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती8, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 1127,आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-49, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-275, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत14,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 85, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-81 दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-29, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -221, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 88, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -05, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 8754, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 10 एवढी आहे.  
आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 275 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-84,शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना_11,संत रामदास वसतिगृह जालना-11,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-18, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-27,मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-02,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-08, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-24 ,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-14,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी-02,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी _06,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-17,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -1,हिंदुस्थाथान मंगल कार्यालय जाफ्राबाद-02,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-34,जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद 14.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 169 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 821 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 33 हजार 430 असा एकुण 3 लाख 60 हजार  238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   
-*-*-*-*-*-*-


No comments:

Post a Comment