Friday 5 June 2020

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभासाठी कृषि विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन


जालना, दि. 5 - गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन 2015-16 पासुन राबविण्यात येत आहे. सन 2019-2020 मध्ये योजनेची व्यात्ती वाढवुन जिल्हयातील सर्व वहितीधारक शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई–वडील ,शेतकऱ्यांची पती/पत्नी मुलगा व अविवाहित मुलगी) या पैकी कोणताही एक व्यक्ती असे 10 ते 75 वयोगटातील एकुण               दोन जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
       शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या कुंटुबातील सदस्य यांचा अपघाती मृत्यू अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते.
         वहितीधारक शेतकऱ्यांच्या अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याचा दुर्देवी मुत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्यांनी संबधित तालुका कृषी अधिकारी ,कृषि पर्यवेक्षक अथवा कृषि सहाय्यक यांचेकडे त्वरित संपर्क करावा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दिनांक 10 डिसेंबर, 2019 ते 09 डिसेंबर 2020 या कालावधीकरिता असून या योजनेचे शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाच्या maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जिल्हा अधीषक कृषि अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  
-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment