Monday 1 June 2020

जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत 30 जुनपर्यंत वाढ जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश निर्गमित शासनाकडून (Mission Begin Again) बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित


जालना, दि. 1 (जिमाका)- कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात विविध प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्‍यात येत आहे. त्‍यानुषंगाने संपूर्ण राज्‍यात लॉकडाऊन दिनांक ३० जुन, २०२० रोजीच्‍या मध्‍यरात्री पर्यंत वाढविण्‍यात आलेला आहे. तसेच लॉकडाऊन मधील निर्बंधांची सुलभता आणि लॉकडाऊन टप्पानिहाय उघडणे (Mission Begin Again) बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्‍या आहेत.  त्याअनुषंगने जिल्‍हादंडाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी  फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४()() मधील तरतूदी नुसार दिनांक ०१ जुन, २०२० रोजीपासून ते दिनांक ३० जुप, २०२० रोजीच्‍या रात्री १२.०० वाजेपर्यंत जालना जिल्‍ह्यातील संपूर्ण ग्रामीण, शहरी क्षेत्रात उक्‍त कालावधीत रात्री ९.०० ते सकाळी ५.०० वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी आदेश लागू केली आहे.
)     सदरील आदेश दिनांक ०१/०६/२०२० पासून अंमलात येईल आणि दिनांक ३०/०६/२०२० रोजी पर्यंत लागू राहील.
 शासनाने खालील प्रमाणे लॉकडाऊन मधील निर्बंधांची सुलभता आणि लॉकडाउन टप्पानिहाय उघडणे (Mission Begin Again) बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्‍या आहेत.    त्या याप्रमाणे.
)   कोविड-१९ च्‍या व्यवस्थापनासाठी निर्धारीत केलेल्‍या राष्ट्रीय मागदर्शक सूचनाः-
कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी निर्धारित केलेल्या परिशिष्‍ट-१ मधील राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना व तरतुदी कायम राहतील.
)   रात्रीची संचारबंदीः-
        दिनांक ०१/०६/२०२० रोजीपासून ते दिनांक ३०/०६/२०२० रोजीच्‍या रात्री १२.०० वाजेपर्यंत जालना जिल्‍ह्यातील संपूर्ण ग्रामीण, शहरी क्षेत्रात उक्‍त कालावधीत रात्री ९.०० ते सकाळी ५.०० वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी आदेश लागू करण्‍यात येत असून सदरील संचारबंदीची काटेकार अंमलबजावणी संबंधीत यंत्रणेनी करावी.

) सहज परिणाम होईल अशा व्‍यक्‍तींची सूरक्षाः-
        ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, अनेक व्‍याधी असणा-या व्‍यक्‍ती, गरोदर महिला आणि १० वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारण वगळता घरातच थांबणे घरीच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

)  कंटेन्‍मेंट झोनः-
i)केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन जिल्‍हा प्रशासन हे त्यांच्या भागातील कंटेनमेंट झोन निश्चित करतील. जिल्‍ह्यात जिल्‍हाधिकारी यांना कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जालना जिल्‍ह्यात उपविभागीय दंडाधिकारी यांना त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रात कंटेनमेंट झोन निश्चित करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी यांच्‍या वतीने प्राधिकृत करण्‍यात येत आहे. असे झोन एक युनिट असावेत जे संसाधनांची उपलब्‍धता लक्षात घेऊन प्रभावीपणे शासीत आणी कार्यक्षमेतेने व्‍यवस्‍थापीत करता येईल. निवासी कॉलनी, मोहल्ला, झोपडपट्टी, इमारत, इमारतींचा समूह, गल्ली, वॉर्ड, पोलीस ठाण्याचे क्षेत्र, गाव किंवा गावांचा छोटा समूह असे कंटेनमेंट झोनचे क्षेत्र असू शकेल. यापेक्षा मोठे क्षेत्र (संपूर्ण तालुका किंवा संपूर्ण महापालिका क्षेत्र इत्यादी) कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी यांचेशी सल्लामसलत करुन निर्णय घ्‍यावा. जिल्‍हाधिकारी हे मुख्य सचिवांशी सल्लामसलत करुन निर्णय घेतील.
ii)कंटेनमेंट झोन क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रातील लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णत: प्रतिबंध करण्यात येत आहे.
)      या आदेशातील परिछेद क्र. ७ मध्ये नसलेल्या आणि ज्यांना स्पष्टपणे प्रतिबंधित किंवा बंदी घातलेली नाही अशा सर्व गतिविधींना खालील अटींसह परवानगी राहीलः-
i) परवानगी असलेल्‍या बाबींना कोणत्‍याही शासकीय यंत्रणेकडून परवानगी घेण्‍याची आवश्‍यकता नाही.
ii)क्रीडा संकुले आणि स्टेडियमचे बाह्य भाग आणि इतर खुल्या सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र व्यायामासाठी परवानगी असेल; तथापि, प्रेक्षक आणि गट क्रियाकलापांना परवानगी दिली जाणार नाही. स्टेडियमचे च्‍या अंतरभागात व्यायामासाठी परवानगी राहणार नाही. सर्व शारीरिक व्यायाम सामाजिक अंतरांच्या निकषांनुसार केले जातील याची दक्षता घ्‍यावी.
iii)     सर्व सार्वजनिक आणि वैयक्तिक वाहतुकीचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे करावे:
दुचाकी वाहने    : १ चालक (रायडर).
तीनचाकी वाहन  : + .
चारचाकी वाहन : + .
iv)     जिल्‍हा अंतर्गत बस वाहतूक ही आसन क्षमतेच्या कमाल ५० टक्के क्षमतेनुसार चालविण्यास परवानगी राहील. तथापि, बसमध्ये योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन होण्यासह बसचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायजेशन) करणे आवश्यक राहील.
v)      आंतरजिल्‍हा बस सेवेच्या अनुषंगाने वेगळे आदेश शासनामार्फत निर्गमित करण्यात येतील.
vi)     सर्व दुकाने (मार्केट/शॉप्स, केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर) सकाळी ९.०० वाजेपासून ते सायं. .०० वाजेपर्यंत या कालावधीत चालू ठेवता येतील. कुठेही गर्दी किंवा योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास अशी दुकाने सक्षम प्रधिकारी यांनी तात्‍काळ बंद करावे.
)      खालील बाबी उक्‍त कालावधीत प्रतिबंधीत राहतील.
i)      शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण, प्रशिक्षण संस्था इ.
ii)     आंतरराष्‍ट्रीय प्रवासी हवाई वाहतूक केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्‍या बाबी वगळून.
iii)     मेट्रो रेल सेवा.
iv)     मानक कार्य प्रणाली आणि स्‍वतंत्र आदेश असल्‍याशिवास रेल्‍वे किंवा देशांतर्गत हवाई प्रवास.
v)      सर्व सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर, बार, सभागृह, असेंब्ली हॉल आणि तत्‍सम इतर ठिकाणे.
vi)     सर्व सामाजिक/राजकीय/ क्रिडा विषयक/ मनोरंजन /शैक्षणिक / सांस्कृतीक /धार्मिक कार्यक्रम / मोठ्या स्‍वरूपातील संमेलने.
vii)    नागरीकांसाठी सर्व धार्मिक स्थळे तसेच इतर सर्व प्रार्थना स्थळे.
viii)   शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्‍टॉरंट आणि इतर आतिथ्य सेवा.
वरील बाबींसाठी शिथिलता देणे / प्रतिबंध उठवणे हे शासना मार्फत प्राप्‍त होणा-या मानक कार्यपद्धती / मार्गदर्शक सूचनांच्‍या अधिन राहून टप्प्याटप्प्याने करण्‍यात येईल.
)      विशिष्ट प्रकरणांमध्ये व्यक्ती आणि वस्तू/ मालाची वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी निर्देशः-
i)      सर्व यंत्रणांनी डॉक्टर्स, परिचारिका आणि  वैद्यकीय कर्मचारी,  स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिकांना कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाशिवाय राज्यातल्या राज्यात आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी परवानगी द्यावी.
ii)     तथापि नागरीकांच्‍या आंतरराज्यीय आणि आंतरजिल्हा हालचाली नियंत्रीत राहतील. अडकलेले कामगार, स्‍थलांतरीत कामगार, यात्रेकरु, पर्यटक, इत्‍यादींच्‍या प्रवासाबाबत शासनाच्‍या निर्गमित एस..पी नूसार नियमन केले जाईल.
iii)     व्‍यक्‍तींच्‍या विशेष श्रमीक रेल्‍वे आणि समुद्री जहाजांचे प्रवासाबाबत शासनाच्‍या निर्गमीत एस..पी नुसार नियमन केले जाईल.
iv)     परदेशात अडकलेल्‍या भारतीय नागरिकांसाठी आणि परदेशात जाण्यासाठी विशिष्ट व्यक्तींची पारगमन व्यवस्थेबाबतीत, परदेशी नागरिकांचे स्थलांतर, साइन-इन आणि साइन-ऑफ भारतीय समुद्री जहाजांचे संबंधीत शासनाच्‍या निर्गमित एस..पी नुसार नियमन केले जाईल.
v)      सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व मालवाहतूक करणाऱ्या आणि रिकाम्या ट्रक यांना आंतरराज्‍यीय वाहतूकीस संबंधीत यंत्रणा परवानगी देईल.
vi)     शेजारील देशांसोबत जे करार करण्यात आले आहेत त्या अंतर्गत होणाऱ्या कोणत्याही वस्तू किंवा माल-वाहतुकीस आपल्या सीमेवर प्रतिबंध करण्याचा अधिकार कोणत्याही यंत्रणेला नसेल.
)      आरोग्य सेतू अॅपचा वापरः-
i)      आरोग्य सेतू अॅप हे कोरोना संसर्गाच्या संभाव्य जोखमीची लवकर ओळख करण्यास मदत करते. हा अॅप व्यक्ती आणि समुदायासाठी ढाल म्हणून कार्य करतो.
ii)     कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्याच्या दृष्टीकोनातून मोबाइल फोन असलेल्या सर्व कर्मचार्‍यांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केले आहे, याची सर्व कार्यालय / विभाग प्रमुखांनी खात्री करावी. 
iii)     नागरिकांनी त्यांच्या मोबाइल फोनवर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावे व त्यांच्या आरोग्य स्थितीची माहिती त्यावर अद्यावत ठेवावी असे निर्देशीत करण्‍यात येत आहे. आजाराचा धोका असलेल्या व्यक्तिला या अॅपमुळे वेळेवर वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल.
१०)    सर्व साधारण सूचनाः-
        कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य विषयक प्रोटोकॉल संदर्भात पुर्वीच्‍या आदेशाप्रमाणेच लागू राहील.
११)    दंडात्‍मक कार्यवाहीः-
कूठल्याही व्यक्तींकडून या आदेशातील सूचनांचे उलल्ंघन झाल्यास त्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुसार कारवाई केली जाईल. त्यासोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.
परिशिष्‍ट-
कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी निर्धारित केलेल्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना
 i)     सर्व सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी फेस कव्हर घालणे अनिवार्य आहे.
ii)     सार्वजनिक स्थानांवर सर्व व्यक्तींनी किमान ६ फुट (२ गज की दुरी) अंतर राखणे बंधनकारक राहील.
दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ फूट अंतर सुनिश्चित करावे आणि दुकानात एकाच वेळी ५ पेक्षा अधिक व्‍यक्‍ती जमणार नाही याची दक्षता घ्‍यावी.
iii)     मोठया प्रमाणावर गर्दी होणारे मोठी सार्वजनीक संमलने / मेळावे. 
लग्‍ना सारख्‍या सार्वजनिक कार्यक्रमात अतिथींची संख्या ५० पेक्षा जास्त नसावी.
अंत्‍यविधी प्रसंगी २० पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना परवानगी असणार नाही.
iv)     सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी थुंकणे राज्य / स्थानिक प्राधिकरणाद्वारे कायदे, नियम किंवा नियमांनुसार विहित केलेल्या दंडास दंडनीय असेल.
v)      सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा, मद्य, इत्‍यादीचे सेवन करण्‍यास मनाई राहील.
कामाच्या ठिकाणी पाळावयाचे अतिरिक्त निर्देश:-
vi)     वर्क फ्रॉम होमः- शक्‍यतोवर घरून काम करण्याची पध्‍दतीचा अवलंब करावा.
कार्यालयीन कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठ आणि औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांमध्ये शिफट निहाय कामाजाच्‍या वेळा निश्चित कराव्‍यात.
vii)    तपासणी आणि स्वच्छताः- सर्व प्रवेश आणि बाहेर जाण्‍याच्‍या मार्गावर आणि सर्वसामान्य भागात थर्मल स्कॅनिंग, हँड वॉश, सॅनिटायझरची व्‍यवस्‍था करावी.
viii)   वारंवार स्वच्छताः- सर्व कामाच्‍या ठिकाणाचे, सार्वजनिक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी जसे की, दरवाजाचे हॅडल आदींचे दोन पाळयादरम्‍यान तसेच वांरवार निर्जतूकीकरण करावे.
ix)     सामाजिक अंतरः- दोन पाळयामध्‍ये सुयोग्‍य अंतर ठेवून तसेच भोजन अवकाशाची वेळ योग्‍य अंतराने ठेवून व इतर मार्गाचा वापर करून कामाच्‍या ठिकाणी योग्‍य सामाजिक अंतर पाळले जाईल यांची दक्षता कामाच्या ठिकाणी प्रभारी असलेल्‍या व्‍यक्‍तींनी घ्‍यावी.
*******




No comments:

Post a Comment