Friday 19 June 2020

जिल्ह्यात एकोणतीस व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर चार रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना, दि. 19 (जिमाका) :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन जालना शहरातील काद्राबाद परिसरातील 2, पोलीस मुख्यालयातील 1, सरस्वती मंदिर परिसरातील-1, अशा एकुण 4 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दि. 19 जुन 2020 रोजी जालना शहरातील खडकपुरा                येथील–9, आनंदनगर येथील-3 ,लक्कडकोट–4, समर्थनगर–2, रामनगर परिसरातील-5, कन्हैयानगर -1, आर.पी.रोड-1, क्रांतीनगर-1, मंगळबाजार -1 सरकारी रुग्णालयातील दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या डॉक्टरांचा-1 नातेवाईक, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील-1 असे एकुण -29 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.
             
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–3561 असुन सध्या रुग्णालयात -101, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1356, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–64, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4318, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने29 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -353, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -3894, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-399, एकुण प्रलंबित नमुने-67, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1245.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती12, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 1139, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-4, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-264, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत22,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 101, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-6, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-225, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 113, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -05, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-8754, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 10 एवढी आहे.  
आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 264 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-85, शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना- 9,संत रामदास वसतिगृह जालना-11, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-18, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-23, मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-02, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-08, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-20, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-14,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी-02, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी–8, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -18,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -1, हिंदुस्थान मंगल  कार्यालय. जाफ्राबाद - 2, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना – 34, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद – 9.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 170 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 835 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 42 हजार 230 असा एकुण 3 लाख 69 हजार 38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   
-*-*-*-*-*-*-


No comments:

Post a Comment