Monday 1 June 2020

पीककर्ज नोंदणीसाठी 15 जुनपर्यंत मुदतवाढ


पीककर्ज नोंदणीसाठी 15 जुनपर्यंत मुदतवाढ
        जालना, दि. 1 (जिमाका) :- खरीप हंगाम 2020-21 साठी जिल्ह्यामध्ये बँकातर्फे पीककर्ज वितरण सुरु आहे. कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये तसेच गर्दीचे नियमन करण्यासाठी जालना जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांकडून पीककर्जाची मागणी https://forms.gle/2T19Tth3uQFe5CgS9 या गुगल लिंकद्वारे 31 मे, 2020 पर्यंत नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते.  या पीककर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली असुन इच्छुक शेतकऱ्यांनी 15 जुन, 2020 पर्यंत पीककर्जासाठी नोंदणी करता येणार असुन गुगल फॉर्मची लिंग jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
            पीककर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी पीककर्जाची नोंदणी https://forms.gle/2T19Tth3uQFe5CgS9 या गुगल फॉर्मद्वारे करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना नानासाहेब चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*******

No comments:

Post a Comment