Friday 19 June 2020

21 जुन रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन घरीच साजरा करा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन

             जालना, दि. 19 - संयुक्त राष्ट्रसंघाने दि.21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणुन घोषित केलेला आहे. पाच हजार वर्षाहुन अधिक परंपरा असणारी योग विदया ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योगदिन हा कार्यक्रम केवळ एक दिवसापुरता कार्यक्रम न राहता योग ही जीवन शैली म्हणुन प्रचलित व्हावी असा शासनाचा मानस आहे. (कोविड-19)प्रादुर्भाव असल्याकारणाने यावर्षी योगदिन घरीच साजरा करण्याच्या सुचना शासनाने दिल्या असुन   सर्व शासकीय, खाजगी कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी तसेच विविध संस्था ,ज्येष्ठ नागरिक ,महिलामंडळ, खेळाडु यांनी आपल्या परिवारासह आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करुन त्याचे फोटो,व्हिडीयो,फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉटसॲपवर मोठया प्रमाणात शेअर करावे. तसेच ऑनलाईन योगा स्पर्धांमध्येदेखील सहभागी व्हावे, असे अवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*******

No comments:

Post a Comment