Wednesday 17 June 2020

लक्ष्मी कॉटेक्स जिनिंग सामनगाव येथे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते सी.सी. आय. कापुस खरेदी केंद्राचा शुभारंभ संपन्न



जालना दि. 16 (जिमाका)-  सामनगाव ता. जालना येथील लक्ष्मी कॉटेक्स जिनिंग येथे  नवीन  सी.सी. आय. कापुस खरेदी केंद्राचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
या केंद्रावर जालना व घनसावंगी तालुक्यातील ऑनलाईन नोंदणीप्रमाणे शेतक-यांचा कापुस घेतला जाईल. यामुळे कापुस उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जालना जिल्ह्यातील शेतक-यांचा घरात कापुस विक्रीविना शिल्लक राहणार नाही, यासाठी आपण पुर्णपणे प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी आमदार कैलास गोरंट्याल, शिक्षण आरोग्य सभापती  कल्याणराव सपाटे, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, मार्केट कमिटीचे संचालक बाबा मोरे,मार्केट कमिटी अंबडचे चेअरमन सतिश होंडे, डॉ. निसार देशमुख, मार्केट कमिटी सचिव जालना श्री. इंगळे, लक्ष्मी कॉटेक्स जिनिंगचे संचालक संजय राठी, रमेश राठी, श्री. वरखडे, शरद तनपुरे, श्री. ठाकरे, अनिल खंडागळे आदी उपस्थित होते.
*-*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment