Wednesday 3 June 2020

चक्रीवादळाच्या अनुषंगाने यंत्रणांनी सज्ज रहाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


जालना, दि. 3 आयएमडी व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मुंबई यांच्यामार्फत वेळावेळी देण्यात आलेल्या संदेशानुसार दि. 1 जुन  ते 4 जुन पर्यंत चक्रीवादळाच्या दृष्टीने या कालावधीत होणारा पाऊस, अतिवृष्टी,  वा-याचा वेग, वीज कोसळणे, झाडे कोसळणे, वाहतुक ठप्प होणे या स्थितीमुळे जिल्ह्यातील सर्व नागरीकांना सावधानतेचा इशारा याबाबतची तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. या संदर्भात सर्व संबंधित शासकीय विभागांनी नागरीक व शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी. प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या निर्देशान्वये खबरदारी घेण्याबाबत संपूर्ण पुर्तता झाली आहे,  याची खात्री तात्काळ करावी व केलेल्या उपययोजनाबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा. तसेच सर्व विभाग प्रमुखांनी मुख्यालयी हजर राहणे बंधनकारक आहे. जिल्हा व तालुका स्तरावरील आपल्या अधिनस्त नियंत्रण कक्ष कार्यान्वीत असणे आवश्यक आहे. तसेच तेथे नियुक्त  अधिकारी, कर्मचारी यांचे आदेश जिल्हा नियंत्रण कक्षास तात्काळ पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका आदेशान्वये दिले आहेत.  
आदेशाचे पालन न करणा-या व्यक्ती, अधिकार,कर्मचारी संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यास येईल आणि पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.  
                                    -*-*-*-*-*-    



No comments:

Post a Comment