Tuesday 2 June 2020

जिल्ह्यात एकाच दिवशी 25 व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह एका कोरोनाबाधित महिलेला यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज


जालना, दि. 2 (जिमाका)- मापेगाव ता. परतुर येथील  आठ, सामनगाव ता. जालना येथील तीन, बदनापुर शहरातील दोन, जालना शहरातील मोदीखाना येथील एक, गांधी नगर येथील एक, लोधी मोहल्ला येथील एक, लक्ष्मीनारायणपुरा येथील एक, व्यंकटेश नगर येथील एक, मंगळ बाजार येथील एक, जाफ्राबाद येथील एक, पांगरी ता. घनसावंगी येथील एक, यावलपिंपरी ता. घनसावंगी येथील एक, पिरपिंपळगांव ता. जालना येथील एक, बेथल ता. जालना येथील एक, सिंदखेड राजा जि.बुलढाणा येथील एक असे एकुण 25 जणांच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडुन पॉझिटिव्ह प्राप्त आहे. तसेच जिल्हा  सामान्य रुग्णालयातुन शिरनेर ता. अंबड येथील एका 38 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णावर यशस्वी उपचार करुन त्यांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने महिलेस दि.2 जुन, 2020 रोजी  डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
            जालना शहरातील 80 वर्षीय पुरुष अत्यावस्थ परिस्थितीत जिल्हा रुग्णालयात दि. 1 जुन 2020 रोजी दाखल झाला होता.  संबंधित रुणावर उपचार सरु असतांनाच त्याचा मृत्यु दि. 1 जुन 2020 रोजी झाला. मृत्युनंतर त्याच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडुन  दि. 2 जुन 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  
एकुण संशयीत रुग्ण -2518 असुन सध्या रुग्णालयात 72 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती 1091,  दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या -27 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2811 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने 25असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -153 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 2647, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या -304, एकुण प्रलंबित नमुने -07, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1017,
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 22, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 910,  आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 28, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-387, विलगीकरण कक्षात  भरतीसाठी पाठविलेले संशयीत 17,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 72,  आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 24, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-01, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-52,  सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 99, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 5027 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या 02 एवढी आहे.  
दि. 1 जुन 2020 रोजी नजर चुकीने प्रेस नोट मध्ये सर्व दुकाने (मार्केट, शॉप्स, केशकर्तनालय, स्पा, सलुन , ब्युटी पार्लर) सकाही 9 ते सायं 5 वाजेपर्यंत या  कालावधीत चालु ठेवता येतील असे लिहिले होते. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कलम 144 (1),(3) अन्वये  जालना जिल्ह्यातील मनाई आदेश लागु करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व दुकाने (मार्केट, शॉप्स) सकाळी 9 वाजेपासुन ते सायं 5 वाजेपर्यंत या कालावधीत चालु ठेवता येतील परंतु केशकर्तनालय, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर पुर्णपणे बंद राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
            कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 387 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-36, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-02,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -24, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-26, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -110, मॉडेल स्कुल, अंबा रोड, परतुर-27, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-01, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-03 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -00 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -19, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-30, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे 36 अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -08, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल इमारत क्र.2-02, मॉडेल स्कुल मंठा-35, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -26, मेरीट हॉटेल-02  व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
            लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 719 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 145 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 658 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 1 हजार 330 असा एकुण                3 लाख 28  हजार 138 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
*******



No comments:

Post a Comment