Wednesday 8 June 2022

आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रम संपन्न

 

           

            जालना, दि. 8:-  बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा अग्रणी बँक जालना, व्यावसायिक बँक आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने आझादी का अमृत महोत्सव  अंतर्गत यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, जालना येथे कार्यक्रम संपन्न झाला.

        कार्यक्रमास महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र दिवेश दिनकर, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कल्पना क्षीरसागर,    बँक ऑफ महाराष्ट्र, औरंगाबादचे अंचल प्रबंधक महेश डांगे, महेश डांगे,  क्षेत्रीय प्रबंधक सूरज यामयार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक सुनील जोशी, आरसेटी जालनाचे संचालक मंगेश डामरे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे आदींची उपस्थिती होती.

            याप्रसंगी दिवेश दिनकर यांनी अद्भूत आणि व्यापक आझादी का अमृत महोत्सव आयोजित केल्याबद्दल सर्व बँकर्सचे अभिनंदन करत बँकांची उत्पादने डिजिटल पद्धतीने ऑफर करून देशातील आर्थिक समावेशनातील अंतर भरून काढण्याच्या मोठ्या संधी आहेत आणि जिल्ह्यातील बँका ते भरून काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            महाराष्ट्र बँक औरंगाबाद झोनचे मॅनेजर महेश डांगे यांनी देशातील प्रत्येक जिल्ह्यात AKAM कार्यक्रम साजरे करण्याचे महत्त्व विषद केले.

            आपला भारत देश स्वातंत्राचा चा अमृत महोत्सव साजर करीत असताना विविध विभाग त्यात सहभागी होत आहेत.या कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 06 ते 12 जुन, 2022 हा आठवडा आइकॉनिक सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यात आर्थिक समावेशन शिबिरांचे आयोजन करून बँकांनी विविध आर्थिक दुर्बल घटक, छोटे व्यापारी, नवउद्योजक, महिलाअश्या 272 लाभार्थीना 8 कोटी रूपयाचे कर्ज मंजूर केले असल्याची माहितीही या कार्यक्रमात देण्यात आली.  तसेच या कार्यक्रमात   विविध महिला बचत गट संबंधित योजना, मुद्रा योजना, PMSvanidhi, PMJDY, PMSBY, PMJJBY, APY, स्टँड अप इंडिया,डिजिटल उत्पादने इत्यादींचा प्रचार करून गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना त्वरित मंजूरी देण्यात आली.

            कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी केले.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment