Thursday 23 June 2022

मदरसा आधुनिकीरण योजने अंतर्गत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 


 

     जालना दि. 23 (जिमाका) :- अल्पसंख्याक विकास विभागाच्या दि. 11 ऑक्टोबर 2013 च्या मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यास समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणांबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयाचे शिक्षण देणे, मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इ.9 वी, 10 वी व 12 वी तील तसेच औद्योगिक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होऊन त्यांची रोजगार क्षमता वाढून आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल या दृष्टीने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देणे यादृष्टीने डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधूनिकीकरण योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

     महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विकास विभाग यांच्या परिपत्रकानुसार 2022-23या वर्षासाठी ही योजना  राबविण्याता येणार असल्याने पात्र मदरशांची शिफारस करण्याचे निर्देशित केले आहे. यास अनुसरुन या शासन निर्णयातील कार्यपध्दतीचा अवलंब करुन तसेच अटी व शर्ती पूर्ण करण्याऱ्या मदरशांनी अर्जासोबत शासन निर्णयांमध्ये नमुद केल्याप्रमाणे कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून हा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयात दाखल करण्याची अंतिम दि. 30 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. तसेच या योजनेच्या अर्जाचा नमुना महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर शासन निर्णय अंतर्गत तसेच अल्पसंख्याक विकास विभागाच्या  https://mdd.maharashtra.com  संकेतस्थळावर योजना शैक्षणिक अंतर्गत शासन निर्णयासोबत अर्जाचा नमुना उपलब्ध आहे.  https://jalna.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment