Monday 20 June 2022

जागतिक योग दिनानिमित्त 21 जून रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे योग शिबीर

 



 

      जालना दि. 20 (जिमाका) :- मंगळवार, दि. 21 जून, 2022 रोजी जागतिक योगदिनानिमित्त  जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे सकाळी 6.40 वाजता योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  या योग शिबीराचे उदघाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय रेल्वे, कोळसा व खणीकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती राहणार आहे.  कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांची उपस्थिती राहणार आहे.  या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी केले आहे.  

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment