Thursday 23 June 2022

आंतरराष्ट्रीय जागतिक “ऑलिंपिक डे” उत्साहात साजरा

 


 

जालना दि. 23 (जिमाका) :- दि. 23 जून 1894 साली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना झाली या दिवसाच्या स्मरणात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा केला जातो. जगभरातील खेळाडूंना सर्वोत्कृष्ट बनविण्याच्या हेतूने प्रोत्साहन देण्यासाठी व प्रवृत्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपीक दिवस साजरा करण्यात येतो.

या दिवशी जालना जिल्हयातील खेळाडूंची रॅली, क्रीडा विषयक प्रात्यक्षिके, क्रीडा विषयक कार्यशाळा, परिसंवाद, खेळाडूंचा सत्कार इ. उपक्रमांचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे दि. 23 जून 2022 रोजी  सायंकाळी 5.30 वाजता करण्यात येणार आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना व सर्व एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्‍़त विद्यमाने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन साजरा करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमासाठी जिल्हयातील गुणवान खेळाडू, क्रीडा संघटक, क्रीडा मार्गदर्शक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा मार्गदर्शक एम.झेड. शेख यांनी केले. याप्रसंगी वैष्‍़णवी रमेश पळसकर, सुजन राजेश हतागळे, दिव्या प्रवीण गायकवाड, इ.राष्‍़ट्रीय स्पर्धेत प्राविण्‍़य मिळविलेल्या गुणवंत खेळाडूंचे ऑलिम्पिक दिनानिमित्‍़त जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी बुके देवून स्वागत केले, तसेच ऑलिम्पिक संघटनेचे शेख चाँद यांचे या प्रसंगी स्वागत करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी जालना जिल्हयातुन मोठया प्रमाणात खेळाडु ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याकरीता तयार झाले पाहीजेत अशी आशा संघटनेच्या पदाधिकारी व खेळाडुंसमोर व्‍़यक्‍़त केली. त्यावेळी फुटबॉल असोसिएशन, जालनाचे अध्‍़यक्ष फिरोज खान यांनी जालना जिल्हयातील जास्तीत जास्‍़त खेळाडु हे ऑलिम्पिक स्पर्धेकरीता तयार होतील त्यासाठी आम्ही प्रयत्‍़नशिल राहु अशी ग्वाही दिली.

तसेच कबड्डी असोसिएशन, जालना चे नाना पाटीळे यांनी जिल्हा क्रीडा कार्यालय, व एकविध खेळ संघटना यांनी समन्वय साधून  काम केले तर नक्कीच  आपल्या जिल्हयातुन मोठया संख्येने खेळाडू ऑलिम्पिक स्‍़पर्धेत जातील अशी अपेक्षा व्‍़यक्‍़त केली.

इंडियाका या नविन खेळाचे प्रत्‍़यक्षिके शेख चाँद यांच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच खो-खो खेलो  प्रशिक्षण केंद्र व  फुटबॉल प्रशिक्षण केंद्र, जालना  ऑलिम्पिक दिनानिमित्‍़त विद्यार्थ्यांनी खेळाडु रॅली काढण्यात आली.

या प्रसंगी मोठया संख्येने खेळाडू विद्यार्थी, विविध खेळ संघटनेचे पदाधिकारी प्रमोद खरात, विजय गाडेकर, नागोजीराव चिलकलवार, सचिन आर्या, मोईस अन्सारी, मयुर पिवळ, मयुर राऊत, इ. उपस्थित होते तसेच कार्यालयातील रेखा परदेशी, संतोष वाबळे, हारुन खान सोपान शिंदे,  राधा कांबळे, सिमोन निर्मळ, इस्माईल शेख  इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता परीश्रम घेतले. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-*-     

 

 

 

No comments:

Post a Comment