Wednesday 8 June 2022

शेतकऱ्यांनी कपाशीच्या विशिष्ट संकरीत वाणाचा आग्रह करु नये

 


   जालना दि. 8 (जिमाका) :-  खरीप हंगाम 2022 साठी शेतकऱ्यांची कृषि सेवा केंद्रावर बियाणे खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. या हंगामासाठी कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद, बाजरी व मका या पिकाचे मुबलक प्रमाणात बियाणे जिल्ह्यात उपलब्ध आहे. कपाशीची लागवड करतांना शेतकरी विशिष्ट वाणाची मागणी कृषि सेवा केंद्रावर करतात त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेले विविध कंपन्यांचे संकरीत कापूस बियाणे लागवडीसाठी वापरावे. तसेच 80 ते 100 मिमि पाऊस व जमिनीत योग्य ओल झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भिमराव रणदिवे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment