Friday 24 June 2022

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणावर एका अशासकीय सदस्याच्या नियुक्तीसाठी आवाहन

 


     जालना दि. 24 (जिमाका) :- प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, जालना यावर एका अशासकीय सदस्याची नियुक्ती करण्याचे निर्देश परिवहन आयुक्त कार्यालयाकडून  प्राप्त  झाले असुन प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तरतुद केल्याप्रमाणे अर्हता प्राप्त इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

     मोटार वाहन कायद्यानुसार अशासकीय सदस्य कोणत्याही ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंगचा मालक, नोकर किंवा इतर प्रकारे आर्थिक हितसंबंध असणारा नसावा. हा व्यक्ती सामाजिक प्रतिष्ठा असलेला व परिवहन, वाहतूक समस्यांची जाण असणारा असावा. ही नियुक्ती किमान 3 वर्षापर्यंतची असेल.

     इच्छुक व अर्हताप्राप्त व्यक्तींना सचिव प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आवाहन करण्यात येते की, त्यांनी वर्तमानपत्रात वृत्तनिवेदन प्रसिध्द झाल्यापासून सात दिवसात आपले नाव व बायोडाटा माहिती अर्जासह उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना येथे वरिष्ठ लिपीक राजेश जाधव यांच्याकडे सादर करावी. असे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment