Thursday 9 June 2022

इ.12 वी पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याचे आवाहन

 

 

     जालना दि. 9 (जिमाका) :-   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुरवणी परीक्षा जुलै – ऑगस्ट -2022 मध्ये घेण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून मी या ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ) Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने इ.12वी साठी www.mahahsscboard.in     या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे

 

शुल्क प्रकार

विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्वरीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ट न झालेले) श्रेणी सुधार व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणारे . ITI  (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे) Transfer of Credit  घेणारे विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने आवेनपत्रे भरावयाच्या तारखा

 

उचच्‍ माध्यमिक शाळांनी, कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख

नियमित शुल्क

शुक्रवार दि. 10 जुन 2022 ते शुक्‌रवार दि.17 जुन 2022

शनिवार दि. 18 जुन 2022 ते मंगळवार दि. 21 जुन 2022

बुधवार दि. 22 जुन 2022

 

   या परिक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्याव्यात.

     ऑनलाईन आवेनदनपत्र भरताना मार्च – एप्रिल 2022 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल.  श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै – ऑगस्ट -2022 व फेब्रुवारी – मार्च 2022 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी.  नियमित शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारे भरण्यात यावे. सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलीत शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. अशी माहिती सचिव माणिक बांगर राज्य मंडळ, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment