Tuesday 14 June 2022

दि. 15 जुन रोजी वाहतुकीत बदल

 


 

    जालना दि. 14 (जिमाका) :- जालना शहरातील पोलिस स्टेशन सदरबाजार जालना व पोलीस स्टेशन कदिम जालना हद्दीत दिनांक 15 जुन 2022 रोजी भाजपा तर्फे जल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जालना शहरात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता असल्याचे गर्दी करणार आहे.

     महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये  प्रदान अधिकारान्वये पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी खालीलप्रमाणे आदेश दिले आहे.

      पोलीस ठाणे सदरबाजार जालना व कदिम जालना हद्दीत दि. 15 जुन 2022 रोजी भाजपा तर्फे जल आक्रोश मोर्चा असल्याने इतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी वाहतुक व्यवस्था सुरळीत राहावी व वाहतुकीची कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी. तसेच सर्वसामान्य जनतेस गैरसोय व धोका होऊ नये म्हणुन या दृष्टीकोनातुन जालना शहरातील वाहनांचे वाहतुकीमध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे.

            बसस्टँडकडून मामा चौक मार्गे, सदर बाजारकडे जाणारी वाहतुक ही दिपक वाईन बार – जुना मोंढा मार्गे – सदर बाजार कडे जातील.

           सदर बाजाराकडून मामा चौक मार्गे बसस्टँड व मंमादेवीकडे जाणारी वाहतुक ही सदर बाजर जुना मोंढा कमान, दिपक वाईन बार मार्गे जाईल.

           शिवाजी पुतळ्याकडुन टांगा स्टँड मार्गे बसस्टँड व मंमादेवीकडे जाणारी वाहतूक ही शिवाजी पुतळ्याकडून बडी सडक, सदर बाजार जुना मोंढा या मार्गे किंवा सदर बाजार मुर्गी तलाव, बसस्टँड मार्गे मंमादेवीकडे जाईल.

            मुक्तेश्वर द्वारकडून शनि मंदिर कडे येणारी वाहतूक ही शनि मंदिर जवळून नुतन वसाहतकडे जाईल व नुतन वसाहतकडुन शनि मंदीरकडे येणारी वाहतुक मुक्तेश्वर प्रवेशद्वार मार्गे जातील.

            सुभाष चौकाकडून मंगळबाजार मार्गे शिवाजी पुतळ्याकडे जाणारी वाहतुक ही सुभाष चौकातुन ट्राफिक ऑफीस, जुना मोंढा, सदर बाजार, बडी सडक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी जाईल.

            शिवाजी पुतळ्याकडुन मंगळ बाजार  पुलीया मार्गे मंगळ बाजार  सुभाष चौक मार्गे मंमादेवीकडे किंवा बसस्टँडकडे जाणारी वाहतुक ही शिवाजी महाराज पुतळ्याजवळुन बडी सडक, सदर बाजार जुना मोंढा या मार्गे किंवा सदर बाजार मुर्गी तलाव बसस्टँडकडे जाईल.

            रेल्वे स्टेशनकडुन मंमादेवी व सुभाष चौकमार्गे शिवाजी पुतळ्याकडे तसेच सदर बाजारकडे जाणारी वाहतुक ही मंमादेवी येथुन महावितरण मार्गे, राजमेहल टॉकीज, चमडा बाजार मार्गे शिवाजी पुतळा व सदर बाजारकडे जाईल.

            रेल्वे स्टेशनकडुन मंमादेवी अथवा चमन रोडने सुभाष चौक मार्गे बसस्टँडकडे जाणारी वाहतुक ही रेल्वे स्टेशन जवळुन अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे मुक्तेश्वर द्वार येथुन बस स्टँडकडे जातील.

            शनि मंदिर जवळून चमन मार्गे बसस्टँडकडे जाणारी वाहतुक ही दिपक हॉस्पीटल मार्गे बसस्टँडकडे जाईल.

      वरील मार्गाचे वाहतुकीमध्ये दि. 15 जुन 2022 रोजी 8 वाजेपासुन ते 6.00 वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. तरी सर्व वाहन धारकांनी यांची नोंद घेण्याचे  पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी आदेशीत केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment