Wednesday 15 June 2022

फुटबॉल खेळासाठी 14 व 16 वर्षाच्या खेळाडुंची निवड चाचणी आयोजित

 


  

जालना दि. 15 (जिमाका) :- शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी पुणे येथील क्रीडा प्रबोधिनी येथे फुटबॉल खेळाच्या प्रशिक्षण व संघ उभारणीकरीता नव्याने खेळाडु भरती करण्यासाठी 14 व 16 वर्षाखालील खेळाडुंची खालीलप्रमाणे निवड चाचणीचे आयोजित केली असून.

     औरंगाबाद विभागासाठी दि. 23 व 24 जुन 2022 सकाळी 7.00 वाजता स्थळ विभागीय क्रीडा संकुल, औरंगाबाद येथे निवड चाचणी घेतली जाईल.

निवड चाचणीसाठी खालीलप्रमाणे मानके निश्चित करण्यात आलेली आहेत.

जन्मतारीख- 14 वर्षाखालील खेळाडुंची जन्म  तारीख दि. 1  जानेवारी 2009 ते 1 जानेवारी 2013 या दरम्यान असावा, 16 वर्षाखालील खेळाडुंची जन्म तारीख 1 जानेवारी 2006 ते 1 जानेवारी 2008 या दरम्यान असावा.

14 वर्षाखालील खेळाडुची उंची –158 सेमीच्यावर असावी 16 वर्षाखालील खेळाडुची उंची 156 सेमीच्यावर असावी.

निवड चाचणीचे निकष

 खेळाडुची उंची, शारिरीक क्षमता, कौशल्य खेळातील कामगिरी

            या चाचणीमधुन ज्या खेळाडुची निवड होणार आहे. त्या खेळाडुंना महाराष्ट्र शासनाकडून मोफत राहणे, पुर्ण शिक्षण व तंत्रशुध्द खेळाचे प्रशिक्षण देण्यात येते. या ठिकाणी उच्चस्तरीय खेळाडू तयार करण्यात येतात. तरी या संधीचा फायदा जालना जिल्ह्यातील 14 व 16 वर्षाआतील मुलांनी घ्यावा.

               उल्लेखित पात्रता निकषानुसार मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील, संस्थेतील, विद्यालयातील, फुटबॉल अकॅडमी, क्लब किंवा संपर्कातील फुटबॉल खेळातील इच्छुक व पात्र खेळाडूंची निवड करण्यासाठी पुढीलप्रमाणे आयोजित निवड चाचणीसाठी उपस्थित राहयास सुचित करावे.

             जालना जिल्ह्यतील पात्रताधारक खेळाडु विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर या निवड चाचणीमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment