Wednesday 22 June 2022

आंतरराष्ट्रीय जागतिक ऑलिंपिक डे दि.23 जुन रोजी साजरा होणार

 


 

     जालना दि. 22 (जिमाका) :-   दि. 23 जुन 1984 साली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना झाली या दिवसाच्या स्मरणात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा केला जातो. जगभरातील खेळाडूंना सर्वोकृष्ट बनविण्याच्या हेतूने प्रोत्साहन देण्यासाठी व प्रवृत्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा केला जातो.

    या दिवशी जालना जिल्ह्यासाठी खेळाडूंची रॅली, क्रीडा विषयक प्रात्यक्षिके, क्रीडा विषयक कार्यशाळा, परिसंवाद, खेळाडूंचा सत्कार इत्यादी उपक्रमांचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे दि. 23 जून 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता करण्यात येणार आहे.

      आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनानिमित्त खेळाडू, संघटना पदाधिकारी सत्कार समारोह दि. 23 जून 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे करण्यात येईल.

   या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील गुणवान खेळाडू, क्रीडा संघटक, क्रीडा मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी आवाहन अरविंद विद्यागार  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment