Thursday 2 June 2022

जालना जिल्हा परिषद, पंचायत समिती आगामी सार्वत्रिक निवडणुका निर्वाचक गणांची रचना व मसूद्याची प्रत प्रसिध्द

 


   जालना दि. 2 (जिमाका) :-  महाराष्ट्र जिल्हा परिष्ज्ञद व पंचायत समिती अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम, 5 चे कलम 12 पोटकलम (1) अन्वये जालना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम 58  (1)  (अ) अन्वये पंचायत समित्यांमध्यील निर्वाचक गणांची रचना व एकुण सदस्य संख्ये बाबत जिल्हाधिकारी, जालना यांच्या क्रमांक रानिआ/जिपपंस-2021/ प्र.क्र. 10 दि. 23 मे 2022 च्या आदेशाच्या मसुद्याची प्रत खाली दर्शविलेल्या ठिकाणी प्रसिध्द करण्यात येत आहे व अशी सुचना देण्यात येत आहे की, वरील मसूदा जिल्हाधिकारी जालना यांच्याकडून त्या आदेशात नमुद केल्यानुसार दि. 2 जुन 2022 नंतर विचारात घेण्यात येईल.

   जिल्हाधिकारी यांचे कार्यालयातील फलकावर. जिल्हा परिषद कार्यालयातील फलकावर. तहसिलदार, भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर, जालना, मंठा, परतुर, घनसावंगी, अंबड यांचे कार्यालयातील फलकावर.  पंचायत समिती, भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर, जालना, मंठा, परतुर, घनसावंगी, अंबड यांचे कार्यालयातील फलकावर.

  आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असलयास त्या संबंधीची जी सकारण लेखी निवेदने, हरकती, सूचना जिल्हाधिकारी यांचेकडे दि. 8 जुन 2022 पर्यंत सादर कराव्यात. वरील तारखेनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेली निवेदने, हरकती, सूचना इतयादी विचारात घेतल्या जाणार नाहीत असे आदेश जिल्हाधिकारी जालना यांनी दिले आहेत.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment