Friday 17 June 2022

वीज पडणे; काय करावे. काय करु नये.

 



जालना दि. 17 (जिमाका) :-  मान्‍सून कालावधीत वीज पडणे / वज्राघात होणे याचे प्रमाण याचे प्रमाण अधिक असल्‍याने जिवित व वित्‍तहानी होत असते. ही एक नैसर्गिक आपत्‍ती असुन जिवित हानी व वित्‍तीय हानी टाळण्‍याच्‍या दृष्‍टीने काय उपाययोजना करण्‍यात याव्‍यात, याबाबत राष्‍ट्रीय आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण यांनी मार्गदर्शक सूचना प्रसिध्‍द केल्‍या आहेत. अशा आपत्‍तीपासून बचाव करण्‍याच्‍या दृष्‍टीने काय करावे व काय करु नये. याबाबत जिल्‍हयातील नागरीकांनी योग्‍य ती  खबरदारी घ्यावी.

वज्राघात - काय करावे व काय करु नये

सतर्कतेची चिन्‍हे / चेतावणी चिन्‍हे

         अति वेगवान वारे, अति पर्जन्‍य आणि काळे ढग

         घोंघावणारे गडगडाटी वादळ, जवळचे झंझावात

        जास्‍त किंवा अधिक जास्‍त प्रमाणात मेघगर्जना

वस्‍तुस्थिती

  वीज ही सामान्‍यपणे उंच वस्‍तूंवर पडते.

               कोणतेही स्‍थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही. परंतू, काही स्‍थान इतर ठिकाणापेक्षा सुरक्षित आहेत.

 मोठी बांधकामे छोट्या किंवा खुल्‍या बांधकामांपेक्षा जास्‍त सुरक्षित असतात.

 जास्‍त पाऊस पडणा-या क्षेत्राच्‍या बाहेरही वज्राघात होऊ शकतो (१६कि.मि.)

               वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो.

सामान्‍य‍तः बाहेर पडलेल्‍या व्‍यक्‍तीच वज्राघातामुळे जखमी किंवा मृत्‍यू पावतात.

वज्राघात बाधीत / जखमी व्‍यक्तिस तुम्‍ही मदत करु शकता त्‍याच्‍या शरीरात कुठल्‍याही प्रकारचा विद्युत प्रवाह सुरु नसतो, त्‍या व्‍यक्‍तीस तात्‍काळ / त्‍वरीत मदत करावी.

 काय करावे

पूर्व तयारी

         वज्राघातापासून बचावासाठी भित्‍तीचित्रे/भित्‍तीपत्रके प्र‍दर्शित करा.

        आपल्‍या भागातील स्‍थानिक हवामानाविषयी अंदाजाची व सतर्कतेच्‍या माहितीचे निरीक्षण करा

          स्‍वतःसाठी व कुटूंबासाठी वज्राघाताच्‍या आपत्‍कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसंदर्भात तसेच स्‍थानिक प्रशासकीय यंत्रणेसंदर्भात संपर्क करण्‍यासाठीचा आराखडा तयार करा.

         वैद्यकीय व स्‍थानिक आपात्‍कालीन सेवांचे संपर्क तपशील तयार करणे.

        आपत्‍कालीन साधने तयार ठेवा

         जर गडगडाटी वादळाचा / अतिवेगाने वाहणा-या वादळी वा-यांचा अंदाज असेलतर घराबाहेर / घराबाहेरील क्रिया पुढे ढकलणे.

          विजेवर चालणा-या वस्‍तू, इलेक्‍ट्रीक व इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तू आणि वातानुकुलीत यंत्रे बंद ठेवावे.

          आपल्‍या घराच्‍या आजूबाजूच्‍या वाळलेले झाडे किंवा मृत झाडांच्या फांद्या काढुन टाकणे.

तुमच्‍या परिसरात वादळी वारे (गडगडाटी वारे) / वीजा चमकत असल्‍यास

घरात असल्‍यास

         घराच्‍या खिडक्‍या व दरवाजा बंद ठेवा.

        घराच्‍या दरवाजे, खिडक्‍या, कुंपण पासून दूर राहा.

        मेघगर्जना झाल्‍यापासून ३० मिनिटे घराच्‍या आतच रहावे.

 घराबाहेर असल्‍यास 

         त्‍वरीत सुरक्षित निवा-याच्‍या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) प्रस्‍थान करावे.

         ट्रॅकटर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्‍यापासून दूर रहा.

      गाडी चालवत असल्‍यास, सुरक्षित स्‍थळी जाण्‍याचा प्रत्‍यत्‍न करा व गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठ्या झाडांपासून तसेच पुराचे पाणी येत असल्‍यास अशी ठिकाणी वगळून लावाव्‍यात.

      खुल्‍या ठिकाणांपेक्षा सामान्‍यतः खिडक्‍या बंद असलेल्‍या, धातूपासून तयार झालेली वाहने (बस, मोटार) चांगली आश्रय स्‍थळे होऊ शकतात.

       उघड्यावर असल्‍यास, शेवटचा पर्याय म्‍हणून लगेच गुडघ्‍यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्‍ही गुडघ्‍यांच्‍या मध्‍ये झाकावे.

        जमीनीशी कमीत कमी संपर्क असावा.

        मोकळ्या तसेच लटकत्‍या विद्युत तारांपासून दूर रहा.

        जंगलामध्‍ये - दाट, लहान झाडांखाली, उताराच्‍या जागेवर निवारा घ्‍यावा.

        इतर खुल्‍या जागेवर : दरीसारख्‍या खोल जागेवर जाण्‍याचा प्रयत्‍न करा (परंतु अचानक येणा-या पुरापासून सावध रहा).

       जर जमीनीच्‍या वर पाणी आल्‍यास ताबडतोब सुरक्षित निवारा शोधून काढा.

 

वीज पडल्‍यास / वज्राघात झाल्‍यास :

         त्‍वरीत रुग्‍णवाहीका व वैद्यकिय मदत बोलवा.

         वज्राघात बाधित व्‍यक्तिस वैद्यकिय मदत मिळवून द्या. त्‍याला हात लावण्‍यास धोका नाही.

        ओल्‍या व थंड परीस्थितीत, इजळाला (बाधित व्‍यक्ति) व जमिनीच्‍या मध्‍ये संरक्षणात्‍मक थर ठेवावा. जेणे करुन हायपोथरमीयाचा  शरीराचे अति कमी तापमान) धोका कमी होईल.

 

खालील प्रमाणे इजा झालेल्‍या इसमास हाताळा :

                          श्‍वसन बंद असल्‍यास :- तोंडावाटे पुनरुत्‍थान  प्रक्रिया अवलंबावी.

      ह्रदयाचे ठोके बंद असल्‍यास :- कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्‍णाची ह्रदय गती CPR चा वापर करुन सुरु ठेवा.

      इजाळाची/रुग्‍णाचा श्‍वास व नाडी सुरु असल्‍यास :- इतर दुखापतींसाठी / आघातांसाठी तपासणे (भाजने/ऐकू न येणे/न दिसणे)

 

 काय करू नये

तयारी

        गडगडाटीचे वादळ आल्‍यास, उंच जागांवर, टेकडीवर, मोकळ्या जागांवर, समुद्र किनारी, स्‍वतंत्र झाडे, रेल्‍वे/बस/सहलीची आश्रय स्‍थाने, दळणवळणाची टॉवर्स, ध्‍वजाचे खांब, विद्युत/दिव्‍यांचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्‍यादी टाळावे. 

घरात असल्‍यास

       वायरद्वारे जोडले गेलेले फोन/मोबाईल व इतर इलेक्‍ट्रीक/इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये, (अशा आपत्‍कालीन वेळी कॉर्डलेस व वायरलेस फोनचा वापर करावा परंतु ते भिंतीला जोडलेले नसावे)

         गडगडीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करु नका.

         या दरम्‍यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे, ही कार्ये करु नयेत.

        कॉंक्रीटच्‍या (ठोस) जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये.

         प्रवाहकीय पृष्‍ठभागांशी संपर्क टाळावा (धातूची दारे, खिडक्‍यांची तावदाने, वायरींग व प्‍लंबींग/नळ) 

घराबाहेर असल्‍यास

         मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असतांना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नका

         वाहनांच्‍या धातू किंवा वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा.

         अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या पासून लांब रहा.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment