Tuesday 7 June 2022

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी अभियांत्रिकी पदविका नोंदणी प्रक्रिया सुरु

 


            जालना दि.7 (जिमाका) :- उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्याकडुन अभियांत्रिकी पदविका नोंदणीची प्रक्रिया दि. 2 जून 2022 पासून सुरु झाली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने नवीन शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता 15 ते 20 दिवस आधीच प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबईद्वारे 23 मे 2022 रोजी जारी केलेल्या अधिसुचनेनुसार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी. 

प्रवेशाकरीता आवश्यक प्रमाणपत्रे

जात,जमात प्रमाणपत्र, जात, जमात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र, दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र, सैन्यदलातील प्रवर्गातील प्रमाणपत्र,अल्पसंख्याक प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र,आधार क्रमांक व संलग्नित बँक खाते.  

      शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी इयत्ता 10 वी नंतरच्या प्रथम वर्ष  व 12 वी नंतरच्या थेट व्दितीय वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय तंत्रनिकेतन, नागेवाडी, जालना या संस्थेची सुविधा केंद्र म्हणुन नियुक्ती करण्यात आले आहेत. संपर्क करण्यासाठी  समन्वयक अब्दुल वासेय सिद्दिकी 8856900100, व प्राचार्य  एम.डी. वाघमारे  9850378773 या नंबरवर संपर्क साधावा तसेच उमेदवारांनी वेळापत्रकानुसार https://poly22.dte.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.  तरी सर्व प्रवेशाकरीता इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य एम.डी. वाघमारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment