Thursday 2 June 2022

शिधापत्रिकाधारकांना आधार नोंदणी करण्याकरीता 30 जून पर्यंत मुदतवाढ

 


जालना दि. 2 (जिमाका) :-  सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी आधार क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. जे लाभार्थी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेऊ ईच्छितात परंतु त्यांचाकडे आधार क्रमांक नाही किंवा आधार साठी नोंदणी केलेली नाही अशा लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार आधार क्रमांक सादर करण्यासाठी किंवा आधार नोंदणी करण्याकरीता दि.३०.०६.२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित लाभार्थी यांनी आपले रेशन कार्डच्या प्रत सह कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड प्रत तहसील कार्यालयात दि. 25जुन 2022 रोजीपर्यंत जमा करणे बाबत आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले.

जे लाभार्थी विहित मुदतीत आधार क्रमांक जमा करणार नाहीत, त्यांचाकडून खालील कागदपत्राची पडताळणी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी केल्यानंतरच लाभ अनुज्ञेय होणार आहेत:-

        शिधापत्रिका,  आधार नोंदणी केल्याची स्लीप किंवा आधार नोंदणी करण्यासाठी केलेल्या विहित नमुन्यातील विनंतीची प्रत,  

        खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र    मतदान ओळखपत्र,   पॅनकार्ड,  पासपोर्ट,  प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला वाहन चालक परवाना,   राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या पत्रावर निर्गमित फोटो ओळखपत्र/फोटोयुक्त बँक पासबुक,  पोस्ट विभागाकडून देण्यात आलेले निवासी पत्ता असणारे कार्ड (नाव व फोटोसहीत), किसान फोटो पासबुक

योजना

जिल्ह्यात एकूण

लाभार्थी संख्या

आधार नोंदणी शिल्लक लाभार्थी संख्या

अंत्योदय अन्न योजना

2,13,669

15,466

प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना

13,17,443

83,317

एपीएल शेतकरी लाभार्थी योजना

1,41,866

11,193

 

वरील माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

No comments:

Post a Comment