Thursday 9 June 2022

 

तालुकास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन

    जालना दि.8 (जिमाका) :- महाराष्ट्र  शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने. समास्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे.  तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने शासन निर्णया अन्वये जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्याचे ठरवले आहे. त्यानुसार तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याचे चौथ्या सोमवारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याचे तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे  आयोजन करण्याचे  नमुद केले आहे.

     शासन निर्णयाप्रमाणे महिलांनी प्रथम संबंधित तहसिलदार यांचेकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार दाखल करावी. तालुका महिला लोकशाही दिनात एक महिन्यांचे आत कार्यवाही न झाल्यास संबंधीत महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनांत  तक्रार दाखल करु शकतील

तालुकास्तरावरील लोकशाही दिनांत अर्जदार महिलेस अंतिम उत्तर शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसिलदार व सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी  यांची राहील. तरी महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment