Friday 24 June 2022

भरारी पथकाकडून 5 कृषी सेवा केंद्रां विरुध्द गुन्हा दाखल

 


 

          जालना दि. 24 (जिमाका) :- खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्याची लगबग सुरू झाल्याने बि- बियाणे खतांची विक्री करताना शेतकऱ्यांची फसवणूक होवू शकते.या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने प्रत्येक  तालुक्यात एक भरारी पथक या  प्रमाणे 8 भरारी पथके व जिल्हा स्तरावर एक भरारी पथक  असे एकूण 9 भरारी पथका कडून तपासणी सुरु झाली असून शेतकऱ्याला बनावट बियाणे ,खते ,कीटकनाशक विक्री केल्यास दुकानाचा परवाना रद्द करण्यासोबतच गुन्हा नोंदविण्याची  कारवाई कृषी विभागाने सुरु केली आहे शेतकऱ्याला बियाणे , खते ,कीटकनाशक दर्जेदार देणे कृषि  सेवा केंद्रांना बंधनकारक  असून योग्य दरानेच विक्री करणे आवश्यक आहे या बाबत शेतकऱ्यांची काही अडवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ 9823915234 या क्रमांकावर तक्रार करावी. निविष्ठा विक्रेते विशिष्ट खत उपलब्ध नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची अडवणूक करतात या साठी जिल्ह्यातील कोणत्या दुकानदाराकडे खताचा किती साठा  आहे. या बाबतची अद्यावत माहिती कृषी विभागाच्या adojalnafertilizer.blogspot.com या ब्लॉगवर उपलब्ध आहे.

मे महिना अखेर जिल्ह्यास बियाणे 105 ,खते 65 व कीटकनाशके 12 नमुने तपासणी चे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी मे अखेर बियाणे 115, खते 51 व कीटकनाशके 10 नमुने तपासणी साठी प्रयोगशाळेस पाठविण्यात आले होते त्यापैकी बियाणांचे 7 नमुने व खताचा 1 नमुना  अप्रमाणित आढळून आला असून अप्रमाणित आढळून आलेल्या बियाणे लॉटच्या 508.60 क्विंटल बियाणास व 25 मे टन  खतास  विक्री बंद आदेश देण्यात आले. जिल्ह्यात या खरीप हंगामात एकूण 5 कृषी सेवा केंद्रा  विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून या मध्ये 2 बियाणे 1 खत व एक कीटकनाशकाचा समावेश आहे.गुन्हा नोंदविलेल्या कृषी सेवा केंद्रातील 25  एच टी बी टी एचटीबीटी सं  कापूस पॉकेट्स , 15 मे  टन  खत  व 52 लिटर कीटकनाशक एवढा साठा  जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment