Friday 17 June 2022

पर्यावरण विषयक जाहीर सुनावणीचे 14 जुलै 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता आयोजन

 


   जालना दि. 17 (जिमाका) :-   मे. श्रध्दा एनर्जी अँड इंफ्राप्रोजेक्ट प्रा. लि. (एसइआयपीएल) गाव वरफळ, ता. परतूर जि. जालना या प्रस्तावित नविन प्रकल्पामध्ये 120 केएलपीडी क्षमतेच्या आसवणी प्रकल्प, ज्यामध्ये 120 केएलपीडी रेक्टीफाइड स्पिरीट/एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल/फ्युल इथेनॉल प्रकल्प शुगरकेन ज्युस/सी मोलॅसेस/बी जड मोलॅसेस कच्चा माल वर आधारित प्रकल्पाचे उत्पादन करणेबाबत पर्यावरण विषयक लोकसुनावणी दि. 14 जुलै 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सुनावणी मे.श्रध्दा एनर्जी अँड इंफ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (एसइआयपीएल), गाव वरफळ, ता. परतूर, जि. जालना  येथे 14 जूलै 2022 वेळ दुपारी 2.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

सदर प्रकल्पाबाबत लेखी स्वरुपात विचार, टिका, टिप्पणी सादर करणे असल्यास जाहीर सुनावणीच्या तारखेपूर्वी उप-प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र नियंत्रण मंडळ, प्लॉट नं. पी-3/1 व पी-3/2, अतिरिक्त एमआयडीसी फेज-2, जालना  या पत्त्यावर अथवा ईमेल- srojalna@mpcb.gov.in,   वेब - www.mpcb.gov.in या ठिकाणी सादर करावी.

   त्याचप्रमाणे, सदर प्रकल्पाच्या परिसरामधील रहिवासी, पर्यावरणविषयी काम करणाऱ्या संस्था, सदर प्रकलपामुळे अन्यप्रकारे प्रभावित होणारे रहिवासी यांना सदर प्रकल्पासंबंधी विचार, टिका, टिप्पणी तोंडी किंवा लेखी स्वरुपात जाहीर सुनावणी दरम्यान सुध्दा नोंदविता येतील.

सदर प्रकल्पाविषयी व पर्यावरण मुल्यांकन अहवालाच्या सारांशाची माहिती असलेले दस्तावेज (इंग्रजी व मराठी) मध्ये खालील कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. संबंधित व्यक्ती खालील कार्यालयामध्ये सदर कागदपत्रे  कार्यालयीन वेळेत अभ्यासू शकतील. जिल्हाधिकारी कार्यालय,  जिल्हा परिषद, जिल्हा उद्योग केंद्र, नगर परिषद, तहसिलदार, तहसिल कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, दरेगाव, ता.जि. जालना, उप प्रादेशिक कार्यालय, म.प्र.नि. मंडळ, प्लॉट नं. पी-3/ 1 व पी-3/2, अतिरिक्त एमआयडीसी फेज-2, जालना प्रादेशिक कार्यालय, म.प्र.नि. मंडळ, भूखंड क्र. ए-4/1, एमआयडीसी चिकलठाणा, औरंगाबाद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुख्यालय, कल्पतरु पॉईंट, 3 रा माळा, सायन माटुंगा स्कीम रोड नं.8, सायन सर्कलसमोर, सायन (पूर्व), मुंबई -22, पर्यावरण विभाग, नवीन प्रशासन भवन, 15 वा मजला, मादामा कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई -32, प्रादेशिक कार्यालय, पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालय, पश्चिम मध्य विभाग, तळमजला, पूर्व विंग, नवीन सचिवालय इमारत, सिव्हिल लाईन, नागपुर या ठिकाणी उपलब्ध असुन संबंधित व्यक्ती खालील कार्यालयामध्ये ही कागदपत्रे कार्यालयीन वेळेत अभ्यासू शकतील, असे माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी सो.म. कुरमुडे यांनी कळवले आहे.

-*-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment