Friday 10 June 2022

घनसावंगी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

 


 जालना दि.10 (जिमाका) :- सन 2022-23 शैक्षणिक वर्षातील प्रवेशित कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, प्रकार-4, घनसावंगी येथे मुलींचे वसतिगृह सुरु असून सन 2022-23 करीता इयत्ता 9 वी ते 12 वी मधील अनु. जाती, अनु. जमाती, विजाभज, इमाव, विमाप्र, तसेच दारिद्र्यरेषेखालील असलेल्या इतर प्रवर्गातील घनसावंगी तालुका स्तरावरील शाळा तसेच माध्यमिक विद्यालयात प्रवेशित विद्यार्थिंनींसाठी प्रवेश सुरु असून इच्छुक विद्यार्थींनी, पालक यांनी तात्काळ वसतिगृहास भेट देऊन अर्ज भरुन आपला प्रवेश निश्चित करावा. या वसतिगृहात मुलींसाठी राहणे, नाष्टा, जेवणाची सुविधा विनाशुल्क स्वरुपात आहे. अशी माहिती गृहप्रमुख कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, प्रकार-4 घनसावंगी यांनी प्रसध्दिीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment