Friday 24 June 2022

शासकीय तंत्रनिकेतन येथील 151 विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड

 

         

    जालना दि. 24 (जिमाका) :- शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे संचालित, शासकीय तंत्रनिकेतन जालना येथील 151 विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

   जालना येथील एम. आय. डी. सी. क्षेत्रात वसलेली  ही संस्था अभियांत्रिकी क्षेत्रात विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी त्यांच्या ईच्छाशक्तीला ऊर्जा प्रदान करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आलेली आहे. संस्थेतील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, कंप्युटर, केमिकल या शाखांमार्फत नवनवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत करण्यात येते. अल्पसंख्यांकांसाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल या शाखांमध्ये अतिरिक्त जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेत विविध उपक्रम राबविले जातात.

 

   संस्थेचे प्र. प्राचार्य डॉ. एम. डी. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनानुसार जी. जी. गोरे प्र. प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी, रोजगार संदर्भात विविध संधी उपलब्ध करुन देण्याकरिता ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत विविध रोजगाराभिमुख उपक्रम राबवितात, याचेच फलित म्हणून यावर्षी अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या 151 विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड झालेली आहे.

     यामध्ये बजाज ऑटो -38, एल अँड टी कन्स्ट्रक्शन -2, इन्फोसिस पुणे -3, व्हेरॉक प्रा. लि. 35 ह्योसंग प्रा. लि. 18, प्यारासन प्रा. लि. - 2, ड्ररोहॉल्वर प्रा. लि. 19, ड्याना ई. प्रा.  लि.- 8, मग्ना ऑटोमोटिव्ह पुणे- 18, जॉन डियर पुणे -5 कालिका  स्टिल कंपन्यामध्ये-3 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

 

तसेच सिमेन्स, जनरल इलेट्रीक एव्हिअशन पुणे कॅनप्याक, एन. आर. बि, ग्राशिम, ई. नामांकित कंपन्या विद्यार्थ्यांना रोजगार देण्यास इच्छुक आहेत. अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

.

-*-*-*-*-*-*-  

No comments:

Post a Comment