Friday 24 June 2022

खतांची विक्री जादा दराने केल्यास कृषि सेवा केंद्राचा परवाना रद्द

 


जालना दि. 24 (जिमाका) :- खरीप हंगामातील पिकासाठी आवश्यक असलेल्या रासायनिक खतांची जाणीवपुर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करून या खतांची सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा ‍ दराने विक्री केल्यास संबधीत कृषि सेवा  केंद्राचा  परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भिमराव रणदिवे यांनी दिला आहे.

            खरीप हंगामास सुरवात झाली असून शेतकरी खरीप हंगामासाठी बियाणे व खते खरेदी करत आहेत.पेरणी योग्य म्हणजे 75 ते 100 मी मी पाऊस झाल्या नंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी . जिल्ह्यात रासायनिक खताचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. कृषि सेवा केंद्राने ज्यादा दराने विक्री केल्याची तक्रार शेतकरी जिल्हा तक्रार निवारण कक्षाच्या 9823915234 या क्रमांकावर करू शकतात किंवा तालुका स्तरावरील पंचायत समिती च्या कृषी विभागात तक्रार निवारण कक्षात करू शकतात.ज्यादा दराने बियाणे/खते विक्री केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधीत कृषि सेवा केंद्राचा परवाना रद्द/निलंबितकरण्यात येईल, तरी सर्व कृषि सेवा केंद्रानी  एमआरपी दरानुसारच खताचीविक्री करावी.

ग्रेड

ग्रेड दर प्रति  बॅग

1) युरिया

266.50 रू

2) डी.ए.पी.

1350 रू

3) एमओपी

1700 रू

4) 20:20:0:13

1470 रू.

5) 15:15:15

1470 रू.

6)10:26:26

1470 रू

येथे तक्रार नोंदवा:-

जिल्हयातील कोणीही खत विक्रेता निश्चित किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करत असल्यास त्याबाबतची तक्रार करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला असून शेतकऱ्यानी मोबाईल क्र 9823915234 या क्रमांकावर तक्रार नोदवावी किंवा तालुका स्तरावरील तक्रार नियंत्रण कक्षाकडे किंवा तालुका कृषी अधिकारी यांचेकडेतक्रार नोंदवावीतसेच शेतकऱ्यांना dsaojalna@gmail.comकिंवा adozpjalna@gmail.comया ई-मेल आयडी वर तक्रार नोंदविता येईल असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालना यांनी सांगितले.

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment