Tuesday 14 June 2022

जिल्ह्यात होणार क्लोरीन वॉश व अनुजैविक तपासणी अभियान नाविन्य पूर्ण उपक्रम


            जालना दि. 14 (जिमाका) :-जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याची टाकी व स्त्रोतांची स्वच्छता ग्रामसेवक व जलसुरक्षक यांच्या मार्फत होणार असून सर्व ग्रामस्थांनी स्त्रोतांची आतून व परिसर स्वच्छता मोहिमेत उस्फुर्त सहभाग नोंदवावा. तसेच ग्रामसेवकांनी आपल्या ग्रामपंचायतचे डब्ल्यु क्यु एम आय एस रजिस्ट्रेशन पूर्ण करुन पाणी तपासणीसाठी जिल्ह्यातील तालुक्यासाठी नेमुन दिलेल्या चार प्रयोगशाळेत जालना, अंबड, मंठा, जाफ्राबाद येथे सादर करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

    पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विविध उपायायोजना राबविल्या जातात. पावसाळ्याच्या कालावधीत विविध प्रकारच्या जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव होत असतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपयायोजना आवश्यक आहेत. या कारणाने जिल्हा परिषद जालना तर्फे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अभियान स्वरुपात दि. 14 जून ते 30 जुलै 2022 या कालावधीत जिल्ह्यात खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. सदर अभियानामध्ये जे ग्रामसेवक, अधिकारी कर्मचारी सक्रीय सहभाग नोंदविणार नाही, पाणी नमुना प्रयोगशाळेस सादर करणार नाही व ज्या गावातील पाणी नमुना दुषित येईल त्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.

क्लोरीन वॉश अभियान (ग्रामसेवक,जलसुरक्षक) कालावधी 14 ते 17 जुन 2022

जिल्ह्यातील सर्व गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची, जलकुंभाची आतून व परिसर साफ सफाई  करणे, सार्वजनिक विहीर व पाणी पुरवठ्याची विहिरीमध्ये पडलेला कचरा काढणे, सविस्तर सुचना देण्यात आलेल्या आहेत. सदर अभियान मुदत दि. 26 मे ते 31 मे 2020 राहील. पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्त्रोतांची नियमित पाणी शुध्दीकरण करणे पाणी नमुने दुषित आढळून आल्यास गंभीर दखल घेण्यात येणार असल्याबात कळविण्यात आले आहे.

अनुजैविक पाणी नमुने तपासणी अभियान (ग्रामसेवक,जलसुरक्षक) कालावधी – 20 जुन ते 30 जुलै 2022

जिल्ह्यातील सर्व गावातील पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्त्रोतांची व काही नळ कनेक्शनच्या पाण्याची अनुजैविक तपासणी ग्रासेवक यांनी आपल्या तालुक्याला नेमून दिलेल्या प्रयोगशाळेकडूनच करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर सुचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. अनुजैविक तपासणी तपासणी अभियान मध्ये एकही गाव वाडी वस्तीचा पाणी नमुना तपासणी पासून राहू नये याबाबत सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत. तपासणी अंती प्राप्त अहवालानुसार पाणी नमुना दुषित आढळून आल्यास गंभीर दखल घेण्यात येणार आहे.

       उपरोक्त दोन्ही अभियान दि. 14 जून ते 30 जुलै 2022 या कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. अभियाना अंती सर्व गटविकास अधिकारी यांचा अभियान विषयक आढावा नियोजित आहे. सदरहील अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी ग्रामसेवक जलसुरख्ज्ञक यांना देण्यात आली आहे.

   सदर अभियान यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर, श्रीमती नम्रता गोस्वामी, श्रीकांत चित्राल, भगवान तायड, संजय डोंगरदिवे, हिमांशू कुलकर्णी, जय राठोड, शुभम गोरे हे परिश्रम घेत आहेत. अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment