Wednesday 15 June 2022

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम नोंदणी प्रक्रिया 30 जुन पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

 


 

  जालना दि. 15 (जिमाका) :- तंत्रशिक्षण संचालनालयाने डीटीई प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका इंजिनिअरींग डिप्लोमा अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर झाले असून त्यानुसार विद्यार्थ्यांनी 30 जुन 2022 पर्यंत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन डीटीईचे संचालक अभय वाघ यांनी केले आहे.

      इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेता  येत असुन हा अभ्यासक्रम 3 वर्षाचा आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पर्याय देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ऑफलाईन पध्दतीने कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. ऑफलाईन पध्दतीने कागदपत्रांची पडताळणीचा पर्याय निवडल्यास विद्यार्थ्यांना तारीख व वेळ ठरवून दिली जाईल. त्यानुसार सुविधा केंद्रात जाऊन अर्ज निश्चिती करावी लागेल. शासकीय तंत्रनिकेतन, जालना या संस्थेला सुविधा केंद्र, फॅसिलिटी सेंटर कार्यरत असून इतर सुविधा केंद्रांची यादी वेब साईटवर प्रसिध्द केली आहे.

     डिप्लोमा प्रवेशासाठी अर्ज करतांना खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना 400 रुपये तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 300 रुपये शुल्क असेल. कागदपत्र पडताळणीच्या वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकउे 31 मार्च 2023 पर्यंतचे वैध असलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (लागु असल्यास) असणे आवश्यक आहे. कागदपत्रे अपलोड करताना काही अडचण उद्भवल्यास शासकीय तंत्रनिकेतन, नागेवाडी, जालना येथील प्रथम वर्ष प्रवेश समितीचे समन्वयक अब्दुल वासे सिद्दीकी यांच्याशी 8856900100 क्रमांकावर संपर्क साधावा.

     शासकीय तंत्रनिकेतन, जालना येथे यंत्र, विद्युत, संगणक, स्थापत्य अभियांत्रिकी या सर्व अभ्यासक्रमास प्रत्येकी 60 जागा प्रथम फेरीत असून रसायन अभियांत्रिकी अभ्यासक्रमास 30 जागा आहेत. अल्पसंख्यांक फेरीत यंत्र, विद्युत  तथा स्थापत्य अभियांत्रिकी या अभ्यासक्रमास प्रत्येकी 60 जागा आहेत. अल्यसंख्यांक समुदायातील – मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी 66 जागा, बौध्द विद्यार्थ्यांसाठी -42 जागा तसेच शिख विद्यार्थ्यांसाठी -3 जागा, पारसी विद्यार्थ्यांसाठी -3 जागा व ख्रिश्चन विद्यार्थ्यांसाठी -6 जागा तथा जैन विद्यार्थ्यांसाठी -6 जागा राखीव आहेत. तरी सर्व  अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी या राखीव जागेचा गुणवत्तेनुसार लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच प्राचार्य डॉ. मंगेश डी. वाघमारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment