Thursday 2 June 2022

4 जुन पासून तीन दिवसीय मोफत उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन

 

    

                                     

            जालना दि. 2 (जिमाका)  :-  तरूणांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही यात्रा दि. ४ जुन रोजी जालना येथे येत आहे. या अनुषंगाने जालना येथे  दि. 4  ते 6 जून  दरम्यान तीन दिवसीय मोफत उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम  आयोजित करण्यात आला आहे.  या प्रशिक्षण कार्यक्रमाचे  उद्घाटन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री  तथा जालना जिल्ह्याचे पालक मंत्री मा. श्री. राजेश टोपे यांच्या हस्ते होणार आहे.

 

            महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांचेवतीने विना अनुदान तत्वावर युथ एड फाऊंडेशन, पुणे या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने ही उद्यमिता यात्रा  उद्योजकता प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. या  राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे जालना येथे स्वागत  व उद्योजकता प्रशिक्षण शुभारंभ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे  मा. जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री मनुज जिंदल, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती करूणा खरात, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था श्री प्रविणकुमार उखळीकर आणि जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री प्रशांत मोघे यांचे उपस्थितीत होणार आहे.

            ही उद्यमिता यात्रा दि. 4 जुन रोजी दुपारी 1 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना  येथे आणि दि. 5 जुन रोजी सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घनसावंगी येथे जावून उद्योजकतेबाबत जनजागरण करणार आहे. जालना येथे  दि. 4  ते 6 जून रोजी दररोज सकाळी 10 ते दु. 3 वाजे दरम्यान तीन दिवसीय मोफत उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे  होत  असून या प्रशिक्षणामध्ये व्यवसायाची संकल्पना विकास, बाजारपेठ अभ्यास, व्यवसाय अपयशाची कारणे, वित्तीय साक्षरता, व्यवसाय नियोजनाचे महत्व, व्यवसाय नियोजन कसे करावे आणि आर्थिक सहाय्य व कायदेशीर बाबीची पुर्तता याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून शेवटी प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे. याचवरोबर सदर प्रशिक्षण पुर्ण करून  व्यवसाय सुरू करू इच्छिणा-या युवकांना  युथ एड फाऊंडेशन, पुणे याचेकडून  पुढे वर्षभर  सहाय्य व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी यापूर्वी नोंदणी केलेल्या  आणि अद्यापही नोंदणी केली नसल्यास   https://bit.ly/3zbfzx2 या लिंकवर  त्वरीत नोंदणी करून इच्छूक उमेदवारांनी सकाळी 9.30 वाजता स्वखर्चाने  प्रशिक्षण स्थळी उपस्थित राहावे   असे आवाहन संपत चाटे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment