Thursday 2 June 2022

घनसावंगी येथील वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

 

 

  जालना दि. 2 (जिमाका) :-   घनसावंगी  येथे एच.एस.सी. उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थीनीना अल्पसंख्यांक मुलीचे शासकीय वसतीगृहात प्रवेश देण्यात येणार असुन

 वसतीगृहाची वैशिष्टे

सुसज्ज व सुशोभित चार मजली इमारत ,100 मुलींच्या राहण्याची उत्तम सोय ,सोलार वॉटरहिटची व्यवस्था , शुध्दपिण्याच्या पाण्याची व्यवस्था ,प्रत्येक विदयार्थीनीकरीता अदयावत फर्निचर्स व बेड

प्रवेशासाठी पात्रता :-  इयत्ता 12 वी व त्यापुढील उच्च शिक्षण घेणा-या महिला उमेदवारांना शासकीय नियमांनुसार प्रवेश.

प्रवेश शुल्क –बिगर अल्पसंख्यांक उमेदवारासाठी सर्व प्रकारचे शुल्क प्रत्येक सत्रासाठी रुपये 2 हजार 350 व डिपॉझीट रुपये 500 शुल्क आकरण्यात येईल ,जेवण ,नाश्ता इ. चा खर्च स्वत भागावावा लागेल , अल्पसंख्यांक जातीतील उमेदवारांचे उत्पन्न रु. 2 लाख 50लाखापेक्षा कमी असल्यास सत्र शुल्क माफ राहील.

कोरे आवेदन पत्र व नि:शुल्क प्राप्त करण्याचा अंतीम दि. 7 जुन 2022 पासुन 25 जुन 2022 पर्यंत

संपर्क- अल्पसंख्यांक मुलींचे शासकीय वसतीगृह , राजेगाव रोड, ता. घनसावंगी जि. जालना दुरध्वनी क्रं. 02483-278755 ,औदयोगिक प्रशिक्षण संस्था, राजेगाव रोड , ता. घनसावंगी ,जि. जालना.अशी माहिती प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था ता. घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे

No comments:

Post a Comment