Monday 6 June 2022

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने उदयोग/व्यवसायासाठी अर्थसहायाबाबत आवाहन

 


            जालना दि.6 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत यापूर्वी कोणत्याही प्रकारचा लाभ न घेतेलेल्या मातंग समाजातील वैयक्तीक अर्जदारांना उद्योग, व्यवसाय करण्यासाठी प्राप्त उद्दीष्टानुसार विविध बँकांमार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याकरीता कर्जाचे अर्ज देणे व स्वीकृतीचा कार्यक्रम दि. 13 जून  ते 14 जूलै 2022 पर्यंत (सुट्टीचे  दिवस वगळून)  वेळ सकाळी 10.30 ते सांयकाळी 5.00 वा. या कालावधीत  संबंधित महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळ मजला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  आयोजित करण्यात आला आहे. प्रत्यक्ष अर्जदारा व्यतिरिक्त इतर त्रयस्थ व्यक्तीकडून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

     सदर योजनेसाठी सन 2022- 23 या आर्थिक वर्षाकरीता प्राप्त उद्दिष्टे पुढीलप्रमाणे  आहे. अनुदान योजनेसाठी 150 व बिज भांडवल योजनेसाठी 100 असे आहे.  यापुर्वी संबंधित कार्यालयाकडे सादर केलेले सर्व कर्जाचे अर्ज रद्द समजण्यात यावे. अर्ज स्वीकृतीच्या वेळेस अर्जदाराने सर्व मूळ कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, कोटेशन इत्यादी संबंधित महामंडळास पाहणीसाठी सोबत आणावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक विकास कुंटूरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment