Friday 17 June 2022

रोजगार मेळाव्यात निवड झालेले उमदेवार बसव्दारे पुण्याला रवाना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या शुभेच्छा

 



जालना, दि. 17 (जिमाका) –  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्यावतीने दि. 28 मे  रोजी येथील अंकुशराव टोपे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या    पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात महिंद्रा अँड महिंद्रा लि,चाकण पुणे या कंपनीच्यावतीने घेण्यात आलेल्या मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांना आज परम स्किल संस्थेच्या सहकार्याने स्वतंत्र्य बसद्वारे पुणे येथे  पाठविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात  जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते  बसला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात  महिंद्रा अँड महिंद्रा लि,चाकण पुणे या कंपनीकडे  ५५ मुले व ७ मुली असे एकूण  ६२ उमेदवारानी मुलाखती दिल्या  होत्या. त्यापैकी   19  उमेदवाराची प्राथमिक निवड करण्यात आली होती. यापैकी   ५ मुले व २ मुली अश्या 7 इच्छुक उमेदवारांना परम स्किल संस्थेच्या सहकार्याने आज पुणे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी मध्ये हजर होण्यासाठी स्वतंत्र्य बस द्वारे पाठविण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी  हिरवी झेंडी दाखवून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.  तसेच सहायक आयुक्त संपत चाटे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. यावेळी  सुरेश बहुरे, कनिष्ठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक श्री योगेश वाघ. अमोल बोरकर, आत्माराम दळवी, कैलाश काळे, सुभोष कदम, मदन पाटोळे, प्रदीप डोळे आणि  परम स्किल संस्थेचे अध्यक्ष  परमेश्वर राजबिंडे हे उपस्थित होते.

 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment